Ramram नमस्कारRamram
बळीराजावर आपले स्वागत आहे.

लेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून  मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. साईटवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा
बळीराजा डॉट कॉमवर वाचा
कविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......
११ वे अ. भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन, नाशिक
नियोजित संमेलनाचे प्रारूप, उपक्रम आणि गुरुकुंजाला कसे पोचावे याबद्दल इत्यंभूत माहिती देणारा व्हीडिओ.
शेतकरी साहित्य संमेलनाचे LIVE प्रसारण "शेतकऱ्यांची चावडी" या You Tube चॅनेलवर होणार आहे.
त्यासाठी आजच चॅनेल LIKE करा, SUBSCRIBE करा आणि बेलच्या आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन ऍक्टिव्ह करा.
SUBSRIBE करण्यासाठी youtube.com/@chawdi किंवा www.shetkari.in या लिंकवर क्लिक करा.
***



विश्वस्तरीय लेखनस्पर्धा-२०१८ : निकाल

अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळीचा उपक्रम

विश्वस्तरीय लेखनस्पर्धा-२०१८ : वर्ष ५ वे

कोटी कोटी शेतकर्‍यांचे पंचप्राण,
शेतीच्या अर्थवादाचे क्रियाशील जनक
युगात्मा शरद जोशी यांच्या ८३ व्या जयंतीदिना निमित्त (३ सप्टेंबर २०१८) आयोजित  

विश्वस्तरीय लेखनस्पर्धा-२०१८ : निकाल

लेखनाचा विषय : शेतकऱ्यांचे मरण हेच सरकारचे धोरण

            ज्या देशात बहुतांश जनतेचे उदरनिर्वाहाचे आणि उपजीविकेचे साधन शेती हेच आहे, त्याच देशात सर्वात जास्त उपेक्षा शेतीचीच व्हावी, हा दुर्दैवविलास आहे. राजकीय, सामाजिक, आर्थिक आणि तत्सम क्षेत्राबरोबरच साहित्य क्षेत्रातही शेती क्षेत्राची पीछेहाट व्हावी, हे सुद्धा अनाकलनीयच आहे. शेतकरी गरीब आहे आणि ज्याच्याकडे आर्थिक सबळता नाही त्याची कुणीही दखल घेत नाही, कदाचित असाच याचा अर्थ आहे. 
 
        पण; आता शेतकर्‍यांच्या मदतीला नवीन संगणकीय व आंतरजालिय तंत्रज्ञान धावून आलेलं आहे. या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अल्पशा खर्चात शेतीविषयाला आंतरराष्ट्रीय पातळीवर व्यक्त होण्याची आणि भारतीय शेतीला वैश्विक साहित्यक्षेत्रात दृगोचर करण्याची जगाच्या उत्क्रांतीच्या इतिहासात पहिल्यांदाच संधी निर्माण झाली आहे. या दृष्टिकोनातून बघितले तर शेतीक्षेत्र ऐतिहासिक वळणावर उभे आहे आणि नेमकी हीच संधी हेरून आम्ही आंतरजालाला विधायक व रचनात्मक कार्यासाठी वापरून घ्यायचे ठरविले आहे. त्याचीच प्रारंभिक पायरी म्हणून अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळ यांच्यावतिने मागील ४ वर्षापासून विश्वस्तरीय लेखनस्पर्धा यशस्वीरित्या आयोजित केली जात आहे. विश्वस्तरीय लेखनस्पर्धेचे यंदाचे हे पाचवे वर्ष.
 
        अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळीचा उपक्रम म्हणून ०३ सप्टेंबर २०१८ ते ०२ ऑक्टोबर २०१८ या कालावधीत www.baliraja.com या संकेतस्थळावर विश्वस्तरीय लेखनस्पर्धा-२०१८ जाहिर करून यशस्वीरित्या पार पाडली होती. या स्पर्धेचा निकाल जाहीर करतांना अत्यंत आनंद होत आहे.
 
       शेतीशी निगडीत विषय साहित्यामध्ये हाताळणार्‍यांची संख्याच उणीपुरी असल्याने आणि लेखनाचा विषय "शेतकऱ्यांचे मरण हेच सरकारचे धोरण" असा जटिल असल्याने  या स्पर्धेला कितपत प्रतिसाद मिळेल या विषयीची धाकधूक मनात होतीच. परंतु यंदा उदंड प्रतिसाद मिळाला आणि देशविदेशातून मराठी भाषिकांनी स्पर्धेत सहभाग नोंदवला, ही बाब खचितच आनंद देणारी ठरली. स्पर्धा यशस्वी होण्यासाठी परिक्षक मंडळाने परिश्रम घेऊन ही स्पर्धा यशस्वी करून दाखविली, त्याबद्दल अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळ त्यांची अत्यंत ऋणी आहे.
 
         लेखनस्पर्धा परिक्षक मंडळ : सरोजताई काशीकर (वर्धा ), ऍड सतीश बोरुळकर (मुंबई), ऍड प्रकाशसिंह पाटील, रमेश शिंदे  (औरंगाबाद), किशोर बळी (अकोला), नितीन देशमुख (अमरावती), रवी धारणे, रत्नाकर चटप (चंद्रपूर) प्रा. भुजंग मुटे (नागपूर)

विश्वस्तरीय लेखनस्पर्धा-२०१८ : निकाल 
लेखनस्पर्धेचा विषय : शेतकऱ्यांचे मरण हेच सरकारचे धोरण

 
अनु   लेखनविभाग     क्रमांक       लेखाचे/कवितेचे शिर्षक       लेखक/कवी      लिंक
 
  1. ललितलेख  - प्रथम - चिमण्या परत आल्या ; अन् गेल्याही - डॉ भास्कर बडे >>> http://www.baliraja.com/node/1679
  2. कथा  - प्रथम - आणि तिनं खुरप्याच्या पाठीला धार लावली - रावसाहेब जाधव >>> http://www.baliraja.com/node/1659
  3. कथा  - द्वितीय - वादळ - आशिष वरघणे >>> http://www.baliraja.com/node/1656
  4. वैचारिक लेख - प्रथम - तुमचे धोरण, हेच आमचे मरण... - पंकज गायकवाड >>> http://www.baliraja.com/node/1635
  5. वैचारिक लेख - द्वितीय - शेतकऱ्यांच्या चळवळी - रामेश्वर अवचार >>> http://www.baliraja.com/node/1642
  6. मागोवा - प्रथम - दीडपट हमीभावाचा सर्जिकल स्ट्राईक - डॉ. आदिनाथ ताकटे  >>> http://www.baliraja.com/node/1695
  7. मागोवा - द्वितीय  - बदलेल धोरण, तर टळेल मरण! - धीरजकुमार ताकसांडे >>> http://www.baliraja.com/node/1626
  8. पद्यकविता - प्रथम - एल्गार - अनिकेत देशमुख  >>>  http://www.baliraja.com/node/1704
  9. पद्यकविता - द्वितीय - माझा राजा बळी - मुक्तविहारी >>> http://www.baliraja.com/node/1638
  10. पद्यकविता - तृतीय - मरणाचे धोरण - सुनंदा साळुंके >>> http://www.baliraja.com/node/1621
  11. छंदमुक्त कविता - प्रथम - करपलयं शिवार - लक्ष्मण खेडकर >>> http://www.baliraja.com/node/1662
  12. छंदमुक्त कविता - द्वितीय - माणसांच्या जिवापेक्षा.. - महेश देसले >>> http://www.baliraja.com/node/1697
  13. छंदमुक्त कविता - तृतीय - धावपट्टी   - राजेश जौंजाळ >>> http://www.baliraja.com/node/1632
  14. गझल - प्रथम - मेला कृषक उपाशी - डॉ. रवीपाल भारशंकर >>> http://www.baliraja.com/node/1628
  15. गझल - द्वितीय - गर्भार कास्तकारी - रमेश बुरबुरे >>> http://www.baliraja.com/node/1614
  16. गझल - तृतीय - चोरीस सूट आता - प्रदीप थूल >>> http://www.baliraja.com/node/1640
  17. गीतरचना - प्रथम - तू रे पोशिंदा जगाचा - रविंद्र दळवी  >>> http://www.baliraja.com/node/1669
  18. गीतरचना - द्वितीय - धोरण - रंगनाथ तालवटकर >>> http://www.baliraja.com/node/1687
  19. गीतरचना - तृतीय - सरकारी धोरण, रचे बापाचे सरण - बालाजी कांबळे >>>http://www.baliraja.com/node/1691
  20. छंदोबद्ध कविता - प्रथम - बळीराजा - चित्रा कहाते >>> http://www.baliraja.com/node/1668
  21. छंदोबद्ध कविता - द्वितीय - रोज नवेच मरण - सिद्धेश्वर इंगोले >>> http://www.baliraja.com/node/1685
  22. छंदोबद्ध कविता - तृतीय - गोट तुमी वो ऐका - के. एन. साळुंके >>> http://www.baliraja.com/node/1620
  23. अनुभवकथन - प्रथम - शेतमालाच्या भावाची लढाई - तेजराव मुंढे >>> http://www.baliraja.com/node/1730
  24. अनुभवकथन - द्वितीय - शेतकऱ्यांप्रती सरकारची अनास्था - नितीन साळुंके >>> http://www.baliraja.com/node/1616
  25. समीक्षण - प्रथम - माणसाच्या सोयीचा देव  -  किरण डोंगरदिवे >>> http://www.baliraja.com/node/1610
Ramram  स्पर्धेत सहभाग नोंदवणार्‍या सर्व सहकारी लेखक कवींचे मनपूर्वक आभार  Ramram
आणि
Congrats विजेत्यांचे हार्दीक अभिनंदन..!! Congrats 
पारितोषिकाचे स्वरूप : मानचिन्ह, प्रशस्तिपत्र व पुस्तके
पारितोषिक वितरण :
  1. २ व ३ फेब्रुवारी २०१९ ला पैठण जि. औरंगाबाद येथे होणार्‍या ५ व्या अ.भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलनात पारितोषिक वितरण केले जाईल. 

  2. स्पर्धकाला स्वतः किंवा प्रतिनिधीमार्फत हजर राहून पारितोषिक स्वीकारता येईल.

  3. पोस्टाने अथवा कुरिअरने पारितोषिक, प्रमाणपत्र अथवा स्मृतिचिन्ह पाठवले जाणार नाही. संबंधितांनी यासंबंधी वारंवार विचारणा करू नये, ही विनंती.

अत्यंत महत्वाचे निवेदन :
            पूर्वानुभव असा आहे कि, अनेक स्पर्धा विजेते संमेलनाला येण्याचे कबुल करूनही प्रत्यक्षात येत नाहीत, त्यामुळे सन्मानचिन्ह (momento) वाया जातात. त्यावर केलेला खर्च व्यर्थ जातो. त्यामुळे सर्व विजेत्यांनी दि. १०/०१/२०१९ पर्यंत आपली संमेलन सहभाग प्रतिनिधी नोंदणी करून घ्यावी. ज्यांनी नोंदणी केलेली असेल फक्त त्यांचे नावाचे सन्मानचिन्ह (momento) तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. संमेलन सहभाग प्रतिनिधी नोंदणी प्रक्रियेविषयी सविस्तर माहिती http://www.baliraja.com/rep-2019 येथे उपलब्ध आहे.

                  गंगाधर मुटे
                     अध्यक्ष
अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळ

Share

प्रतिक्रिया

  • ravindradalvi's picture
    ravindradalvi
    शनी, 05/01/2019 - 13:07. वाजता प्रकाशित केले.

    विश्वस्तरीय लेखन स्पर्धा २०१८ या लेखन स्पर्धेत सहभागी झालेल्या आणि विजयी झालेल्या सर्व कवीमित्रांचे सर्वप्रथम वावरभर अभिनंदन
    यां वर्षी दिलेला विषय थेट निर्भीड आणि खरोखर चिंतनाची अभ्यासाची कसोटी पाहणारा असाच होता. यां निमित्याने शेती शेतकरी आणि एकूणच
    सर्व व्यवस्थेकडे केवळ आभासी दृष्टीकोनातून न बघता, डोळसपणे वस्तूनिष्ठ विज्ञानवादी भूमिकेतून विचाराची आवश्यकता असल्याचे प्रकर्षाने जाणवले. हि स्पर्धा मला माझ्यापुरती समृध्द करून गेली. सर्व मान्यवर परिक्षकांचे आणि ... मुटे सरांचे आभार

    रवींद्र अंबादास दळवी
    नाशिक

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    शनी, 05/01/2019 - 21:35. वाजता प्रकाशित केले.

    आपण सर्वांनी अनोळखी विषय असूनही स्पर्धेत भाग घेऊन स्पर्धा यशस्वी केली त्याबद्दल आपलेही आभार!

    शेतकरी तितुका एक एक!