नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
"गझल"
लाखो किसान मेले, फसव्याच धोरणाने..!
खोटे हिशेब सादर, केलेत शासनाने..!
त्यांना हवे तसे मग, केलेत पंचनामे,
शेतातल्या शवांचे, आपापल्या मनाने..!
रबरासमान आहे, ताणून कर्ज माझे,
देतोय जीव मी या, एकाच कारणाने..!
अन्नास खुद्द आता, मोताद अन्नदाता,
झाला बळी कुपोषित, त्यांच्याच शोषणाने..!
नुसत्याच गाव गप्पा, करतेय हे प्रशासन,
ध्यानात घेतले का ?, हे सत्य बहुजनाने..!
__रमेश अरुण बुरबुरे
मु. निंबर्डा, पो.शिरोली
ता.घाटंजी, जि.यवतमाळ
पिन कोड : ४४५३०१
मोबाईल नंबर : ९७६७७०५१७०
ई मेल आयडी : burbureramesh@gmail.com
प्रतिक्रिया
जबरदस्त!
क्या बात रमेश! एक नं. यार!!
Dr. Ravipal Bharshankar
थॅन्क्स यू सर जी
मनस्वी खूप खूप आभार सर जी
R.A.Burbure
Dhirajkumar B Taksande
रबरासमान आहे ताणून कर्ज माझे
देतोय जीव मी हा एकाच कारणाने
जबरदस्त शेर!
जबरदस्त!! गझल रमेश भाऊ!
मनापासून खूप खूप धन्यवाद सर जी
थोडा बदल केला सर..... किंचित दुरुस्ती बाकी राहून गेली होती नजर चुकीने....
R.A.Burbure
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत. अभिनंदन....!
शेतकरी तितुका एक एक!
पाने
शेतकऱ्याची चावडी - ताजा vdo-1
कळले, बाकी सब गल्लाभरु
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र
लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali
***
हवे ते शोधा
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
लोकप्रिय लेखन (वाचनसंख्या)
पाने
प्रवेशिका दाखल करण्याची अंतिम मुदत : २४ सप्टेंबर २०२४
आज सर्वाधिक वाचन
पाने
User Details
सदस्य खाते
सदस्य प्रवेश
सध्या साईटवर हजर सदस्य
सध्या बळीराजावर 0 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.
शेतकऱ्याची चावडी - ताजा vdo-2
शेतकऱ्याची चावडी - ताजा vdo-3
साहित्यिकांना सोलून काढणारे भाषण