नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
बंद ही दारे अशी
मोकळी मी करीत आहे
या ऊजाड माळराणावर
वाट तुझी बघत आहे
कढत् आहे, सलत आहे
ऊरात हे रुतत आहे
सागराला पुर आला
आसवेही वाहात आहे
जागलो मी, पेटलो मी
विझलो कधी नव्हतोच मी
ऊत्कटता दबुन होती
ह्रुदयास ग, या आस होती
फोडेन मी तोडेन मी
बन्धने ही कारागृहाची
फडफड ही काळजाची
सहवास का! दुर्मीळ आहे
अंत आहे, ही खंत आहे
महंत मी मुळीच नाही
बेवफा तुला कसे म्हणु
तो.. दुसरा पण संत नाही
आभास हा, भास आहे
तुझाच ग सहवास आहे
ऊघडताच नयन हे..
मृगजळच नशिबात आहे
प्रतिक्रिया
सुरेख कविता.
सुरेख कविता.
शेतकरी तितुका एक एक!
पाने