![]() ![]() बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
ही कविता तुम्ही तुमच्या पर्सनल खात्याच्या गेस्टबूक मध्ये प्रकाशित केली आहे.
काय अडचन येत आहे?
कशावर काम करता आहात, मोब की कॉप्युटर?
http://www.baliraja.com/node/add या धाग्यावर लिहावी.
जिद्द......
सांग थोडे पावसाला कोरडा मधुमास गेला
प्यायला पाणी मिळेना तोंडचाही घास गेला !
अंत:करणातून जेव्हा नष्ट झाली ओल सारी
पोत गेला या भुईचा रांगडा सहवास गेला !
पेटलेल्या कातळावर रौद्र जळते हे निखारे
भावभोळ्या जीवनाचा जाच ना वनवास गेला !
तापले आभाळ सारे करपली निष्पर्ण झाडे
मोसमाची आस गेली व्यर्थ हर अदमास गेला !
फोडलेले आर्त टाहो का तुला ऐकू न आले ?
तू दयाळू तू कृपाळू अढळ हा विश्वास गेला !
जिंकलेल्या वेदनांना जिंकण्याची जिद्द होती
याचसाठी प्राण त्याचा लावता गळफास गेला !
अंजली राणे वाडे .
वसई .
प्रकाशन दिनांक | शीर्षक |
---|---|
07 - 04 - 2025 | कविता म्हणजे काय? |
06 - 04 - 2025 | कवितेची व्याख्या - कवितेची बाराखडी |
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
सध्या बळीराजावर 2 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.