पिढ्यान्पिढ्यांच्या अबोलतेला लिहिते-बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
काव्यधारा
माझी गझल निराळी
मुकी असेल वाचा
कसा वाजवू टाळी, मी देऊ कशी दाद? पहिला चेंडू छक्का, दुसर्या चेंडूत बाद
तुझे-माझे जमले कसे, करतो मी विचार भाषा तुझी तहाची, मला लढायचा नाद
विसरभोळा असे मी सांगतो वारंवार भूल पडते देणींची, घेणे असते याद
सरकारी खजिन्यावर मारून घ्यावा हात चिरीमिरी दिली तरी मिटून जाईन वाद
’अभय’ तुझे ऐकुनिया तो चिडला असेल; पण, मुकी असेल वाचा तर देणार कशी साद?
गंगाधर मुटे ........................................................ (वृत्त - मात्रावृत्त) ..................................................................
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali ***
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
सध्या बळीराजावर 0 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.