![]() ![]() बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
जीव टांगला रं मेघा
तुला आता तरी भान यावं
बरसून तू बेभान
मला जीवदान द्यावं
तहानलेलं काळं रान
फाटलया जागोजाग
न बरसता गेला तू तर
मीही येतो मागोमाग
बघून शेतातल्या भेगा
जीव कासावीस होई
पाही जीव डोळ्यात आणून
कधी दिसतो तू डोई..
कसा निष्ठूर मनाचा तू
जसा अस्सल सावकार,
मला दाखविता दया
झाल्यास ओसाड घरदार
तुम्हा विनवितो राजे हो
जरा इमाण जागवा
धावा फुलवाया रान
पोशिंदा जगाचा वाचवा...
- आत्तम गेंदे, परभणी
9420814253
प्रतिक्रिया
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत. अभिनंदन....!

शेतकरी तितुका एक एक!
स्पर्धाविजेती प्रवेशिका.
स्पर्धाविजेती प्रवेशिका. अभिनंदन....!

शेतकरी तितुका एक एक!
पाने