पिढ्यान्पिढ्यांच्या अबोलतेला लिहिते-बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
काव्यधारा
कविता
अंगावरती पाजेचिना....!!
इभ्रतीला झाकेचिना, तिला चोळी का म्हणावे? भुकेल्याला लाभेचिना, तिला पोळी का म्हणावे?
वास्तवाला चितारेना, तिला शाई का म्हणावे? अंगावरती पाजेचिना, तिला आई का म्हणावे?
श्रमाविना पैदासते, तिला वृद्धी का म्हणावे? पीडितांना कुस्कारते, तिला बुद्धी का म्हणावे?
अस्सलाची विटंबना, तिला नक्कल का म्हणावे? बुरशीवाणी परजीवी, तिला अक्कल का म्हणावे?
विवेकाला स्मरेचिना, तिला सुज्ञ का म्हणावे? तारतम्य हुंगेचिना, तिला तज्ज्ञ का म्हणावे?
अभयाने बोलेचिना, तिला वाणी का म्हणावे? अंतरात्मा हालेचिना, तिला ज्ञानी का म्हणावे?
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali ***
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
सध्या बळीराजावर 0 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.