Ramram नमस्कारRamram
बळीराजावर आपले स्वागत आहे.

लेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून  मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. साईटवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा
बळीराजा डॉट कॉमवर वाचा
कविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......
शेतकऱ्यांची चावडी shetkari dot in

आजच चॅनेल LIKE करा, SUBSCRIBE करा आणि बेलच्या आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन ऍक्टिव्ह करा.
SUBSRIBE करण्यासाठी youtube.com/@chawdi किंवा www.shetkari.in या लिंकवर क्लिक करा.
***



IT कार्यशाळा - व्हाटसऍपचा वापर व सुविधा : Part I - भाग-१४

IT कार्यशाळा - व्हाटसऍपचा वापर व सुविधा : Part I - भाग-१४
 
व्हाटसऍपचा जबाबदारीने वापर कसा करावा याविषयी स्वतः व्हाटसऍप काय म्हणते ते आधी जाणून घेऊयात!
 
Whatsapp          इतर लोकांशी साध्या, सुरक्षित आणि विश्वासार्ह पद्धतीने संवाद साधता यावा या उद्देशाने व्हाटसऍप तयार करण्यात आले आहे. मेसेजिंग हे मुलभूतरीत्या खाजगी आहे आणि आमच्या सेवाशर्ती आमचा प्लॅटफॉर्म आणि आमचे वापरकर्ते सुरक्षित राहतील अशा पद्धतीने तयार करण्यात आल्या आहेत. व्हाटसऍप जबाबदारीने कसे वापरावे हे समजून घेण्यासाठी अनेकांनी आमच्याकडे विचारणा केली आहे. आणि म्हणूनच वापरकर्त्यांना व्हाटसऍप वापरताना उत्तम अनुभव यावा यासाठी आम्ही ही मार्गदर्शक तत्त्वे विकसित केली आहेत. व्हाटसऍप चे सर्व वापरकर्ते, जसे की सरकारी संस्था, राजकीय पक्ष आणि राजकीय नेते या सर्वांनीदेखील व्हाटसऍप वापरताना खालील नियम पाळणे आवश्यक आहे. व्हाटसऍप वर ऑटोमेटेड पद्धतीने येणारे आणि भरपूर प्रमाणात येणारे मेसेजेस म्हणजेच बल्क मेसेजिंग कसे प्रतिबंधित करावे याविषयी हा व्हाइट पेपर.
 
व्हाटसऍप वापरताना या गोष्टी ध्यानात ठेवणे उत्तम :
 
         मेसेजिंग खाजगी ठेवा: वैयक्तिक चॅटसाठी आणि लहान ग्रुप्समधील चॅटसाठी वापरकर्त्यांनी त्यांचे खाते स्वतःच व्यवस्थापित करणे अपेक्षित आहे. लोकांची परवानगी मागा: एखाद्या व्यक्तीने स्वतःहून तुमच्याशी संपर्क साधला असेल किंवा तुम्ही व्हाटसऍप द्वारे त्यांच्याशी संपर्क साधावा अशी विनंती त्यांनी स्वतःहून केली असेल, अशाच व्यक्तींना मेसेज पाठवावा. लोकांनी सर्वप्रथम तुम्हाला स्वत:हून मेसेज करावा यासाठी तुम्ही तुमचा फोन नंबर देणे उत्तम ठरेल. कोणी तुम्हाला त्यांचा फोन नंबर दिला असेल तर त्यांच्या अपेक्षेप्रमाणे त्यांना मेसेज करावा. जसे की, प्रथम तुम्ही कोण आहात आणि त्यांचा फोन नंबर तुम्हाला कसा मिळाला हे त्यांना सांगा.
 
लोकांच्या इच्छेचा आदर करा: एखाद्या वापरकर्त्याने तुम्ही त्यांना मेसेज पाठवू नये असे सांगितले असेल तर, त्यांना तुम्ही तुमच्या ॲड्रेस बुकमधून काढून टाकावे आणि त्यांना परत संपर्क साधण्याचा प्रयत्न करू नये. एखाद्या व्यक्तीला ग्रुपमध्ये सामील करण्यापूर्वी त्यांची परवानगी मिळवणे आवश्यक आहे. तुम्ही एखाद्या व्यक्तीला ग्रुपमध्ये गटामध्ये सामील केले आणि ती व्यक्ती स्वतःहून त्या गटामधून बाहेर पडली, तर त्यांच्या निर्णयाचा आदर करा.
 
ग्रुप नियंत्रणे वापरा: आम्ही व्हाटसऍप ग्रुप्ससाठी 'केवळ ॲडमीनच मेसेज पाठवू शकतील' हे सेटिंग विकसित केले आहे. तुम्ही ॲडमीन असाल तर, सर्व सहभागी की केवळ गट ॲडमीनच ग्रुपवर मेसेजेस पाठवू शकतात हे तुम्ही ठरवू शकता. हे फीचर वापरल्याने ग्रुप्समध्ये येणारे नकोसे मेसेजेस बंद होण्यास मदत होते. फॉरवर्ड करण्यापूर्वी दोन वेळा विचार करा: प्रत्येक फॉरवर्ड होणाऱ्या मेसेजला आम्ही लेबल लावतो जेणेकरून, शेअर करताना लोक एकदा विचार करतील.
 
हे करू नका
 
नकोसे, ऑटोमेटेड आणि भरपूर मेसेजेस पाठवणे: व्हाटसऍप वरून भरपूर मेसेजेस, ऑटोमेटेड मेसेजेस पाठवण्याचा आणि ऑटो-डायल करण्याचा प्रयत्न करू नका. व्हाटसऍप हे मशीन लर्निंग टेक्नॉलॉजी आणि वापरकर्त्यांकडून येणारे रिपोर्ट्स या दोन्हीचा वापर करून नको असलेले मेसेज पाठवणारे खाते बॅन करू शकते. लोकांना आवडणार नाही अशा प्रकारे या वापरकर्त्यांशी पद्धतशीरपणे संपर्क साधणाऱ्यावरही अशा पद्धतीची कारवाई होते. शिवाय, अनधिकृत किंवा ऑटोमेटेड खाती किंवा ग्रुप्स तयार करू नका किंवा व्हाटसऍपच्या अनधिकृत आवृत्त्या वापरू नका.
 
जी संपर्क यादी तुमची नाही ती वापरणे: परवानगी शिवाय कोणाचाही फोन नंबर शेअर करू नका किंवा बेकायदेशीर स्रोतांमधून येणार डेटा वापरून (जसे की फोन नंबर्स विकत घेणे) व्हाटसऍप वापरकर्त्यांना मेसेज पाठवणे किंवा त्यांना ग्रुप्समध्ये सामील करणे, हे कधीही करू नका.
 
ब्रॉडकास्ट लिस्टचा अतिवापर करणे: वापरकर्त्यांनी तुमचा फोन नंबर त्यांच्या ॲड्रेस बुकमध्ये समाविष्ट केलेला असेल तरच त्यांना तुम्ही ब्रॉडकास्ट लिस्ट वापरून पाठवलेले मेसेजेस मिळतात. तुम्ही ब्रॉडकास्ट मेसेजचा वारंवार वापर केला तर, तुमच्या या मेसेजेसची तक्रार केली जाण्याची शक्यता असते. ज्या खात्यांची अनेकवेळा तक्रार नोंदवली गेली आहे अशी खाती आम्ही ब्लॉक करतो.

आमच्या सेवाशर्तींचे उल्लंघन करणे: आम्ही येथे याची आठवण करून देऊ इच्छितो की, चुकीची व बेकायदेशीर माहिती प्रकाशित करणे, धमकी देणारे, भीतीदायक, द्वेष व मत्सर असलेले आणि जातीय किंवा धार्मिक भावना दुखावणारे मेसेजेस पाठवणे हे आमच्या सेवाशर्तींनुसार निषिद्ध आहे. व्हाटसऍप बरोबर तुमचे नाते सेवाशर्तींमध्ये नमूद केले आहे, आणि जर वरील मसुद्यामध्ये आणि सेवाशर्तींमध्ये काही तफावत आढळल्यास सेवाशर्तींमधील मजकूर ग्राह्य धरावा.
 
Share