पिढ्यान्पिढ्यांच्या अबोलतेला लिहिते-बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
भलत्याच ऐनवेळी, हटकून तोल गेला नादान सद्गुणांनी अवसानघात केला
जागून रात्र सारी, उपयोग काय झाला? सावज रणात येता, कुत्रा पळून गेला
सांगू नकोस भलते सलतेच तू बहाणे उरलाय शब्द केवळ, का ओल आटलेला?
नेमून लक्ष्य केले साधेपणास माझ्या झालीय तीच राणी, माझा गुलाम केला
समजायला हवे ते, समजून आज आले काही इलाज नाही, पोटातल्या भुकेला
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali ***
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
सध्या बळीराजावर 1 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहे.