![]() ![]() बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
राख झालेल्या शवाला घास पिंडाचा मिळाला...
पण खरा आत्मा भुकेल्या कावळ्याचा शांत झाला...
भार झाले जन्मदाते मोडली कावड मनाची
श्रावणाने ह्या खरे तर तारले वृध्दाश्रमाला...
श्वास ह्या देहात तोवर तू मला हरवून दाखव
पाहुनी निर्धार माझा राग येतो वादळाला...
आसवांचे थेंब काही ठेवुया डोळ्यात शिल्लक
पावसासाठी मृगाच्या तरसलेल्या चातकाला...
राख बापाच्या चितेची फेकली शेतामधे अन्
आणखी काही हवे का? प्रश्न पुसला पावसाला...
................ निलेश कवडे अकोला
मो. 9822367706
प्रतिक्रिया
निलेशजी
तुम्ही गजल नामक भानगडीला पण मनात जागा दिलीत
त्याबद्दल धन्यवाद, अभिनन्दन, आणि शुभेच्छा!
धन्यवाद
धन्यवाद सर
धन्यवाद सर
प्रवेशिकेचे मनपूर्वक
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
अभिनंदन....!
शेतकरी तितुका एक एक!
गझल
निलेशजी,
अतिशय अप्रतिम आणि काळजाला भिडणारी गझल लिहिली आहे.
रविंद्र कामठे
आपला विश्वासू,
रविंद्र कामठे
पुणे
भ्र. न. ९८२२४ ०४३३०
इमेल – ravindrakamthe@gmail.com
अप्रतिम
अप्रतिम गझल
पाने