नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
शेतकऱ्याच्या मुला...!
शेतकऱ्याच्या मुला अन् काय पाहीजे तुला
राब राब राबून बाप आयता पोसतो तुला || ध्रृ. ||
शिकाचा मानस नाही रे तुझा
रिकामा फिरून झालास ओझा
मोठ्यांच्या घरी नाही रे असे
वारसा चालिवीते विकून जोडे खुला
तू तर पोशिंद्याचा आहे रे मुला
राब राब राबून बाप आयता पोसतो तुला ||१||
आपली जमीन आपुण भुमीहीन
याच मायच्या पदरामंदी आपण दीन
आपली अवस्था आपण जबाबदार
एकीच्या भंगापाई आयते सरदार
समजून घे व्यवस्था काय पाहीजे मुला
राब राब राबून बाप आयता पोसतो तुला ||२||
आपल्या मतांनी विजयी निवडणूक
चौफेर आपली दरसाल पिळवणूक
पाच वर्ष म्हणतो आपण मोठ्ठी केली चूक
अशा सरकारपाई आपली जशीच्या तशीच भूक
नकोस आता कानाडोळा जाणून घे रे मुला
राब राब राबून बाप आयता पोसतो तुला ||३||
आभाळ खाली ओढायचं नाही
चंद्राला हात पुरवायचा नाही
होईल विजय आपला आता
आपल्याच कष्ठावर पेटतो घरोघरी भाता
चल रे उतरूया रणांगणांच्या पुला
राब राब राबून बाप आयता पोसतो तुला. ||४||
- आशिष वरघणे
रा. सिरूड पो. वेळा त. हिंगणघाट जि. वर्धा
पिन. ४४२३०१
मो. ९६३७८१३५०६