Ramram नमस्कारRamram
बळीराजावर आपले स्वागत आहे.

लेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून  मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. साईटवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा
बळीराजा डॉट कॉमवर वाचा
कविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......
शेतकऱ्यांची चावडी shetkari dot in

आजच चॅनेल LIKE करा, SUBSCRIBE करा आणि बेलच्या आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन ऍक्टिव्ह करा.
SUBSRIBE करण्यासाठी youtube.com/@chawdi किंवा www.shetkari.in या लिंकवर क्लिक करा.
***

आजचे बाजारभाव

आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.




कवितेचे रसग्रहण -खेळ मांडला

लेखनप्रकार: 
समीक्षण-रसग्रहण स्पर्धा-२०१६
लेखनविभाग: 
कवितेचे रसग्रहण

कवितेचे रसग्रहण
खेळ मांडला

काळजाचा ठाव घेणारं आणि मेंदूत आरपार उतरणारं गुरू ठाकूर यांचे गीत म्हणजे 'खेळ मांडला'.

नटरंग चित्रपटात हे गीत कोणत्या
पार्श्वभूमीवर येते,ते मला फारसे महत्वाचे वाटत नाही. पण शेतकऱ्याच्या जीवनाशी अन् काळ्या मातीशी नाते सागंणारी गुरू ठाकूर यांची हि कविता काळजाला न भिडली तर नवलच!

"तुझ्या पायरीशी कुनी सानथोर नाई
साद सुन्या काळजाची तुझ्या कानी येई"

माझा शेतकरी राजा देवाचा धावा करतोय.काळजाच्या व्यथा मांडताना देव कुणाचा भेदभाव करत नाही याची आठवण करून देतो.
सुन्या काळजातून निघालेले आर्त शब्द हृदय पिळवटून टाकतात.

"तरी देवा सरं ना हयो भोग कशापायी
हरवली वाट दिशा अंधारल्या दाही"

दुष्काळात होरपळलेला
,परिस्थितीने हतबल झालेला शेतकरी म्हणतो की हा भोग आता कधी संपेल.सर्व वाटा आता बंद झाल्यात.जीवनात फक्त अंधाराचेच दुःख दाटले आहे.

"ववाळून उधळतो जीव मायबापा,
वनवा हयो, उरी पेटला,खेळ मांडला"

देवा,माझा जीवचं तुला ओवाळून टाकतोय, कारण उरात गरीबीचा वणवा पेटलेला असताना आता माझ्याकडे ओवाळण्यासारखे दुसरे काहीच नाही. शेतकऱ्याचा जन्म घेऊन आलोय हाच एक आयुष्याचा खेळ झालायं.

"सांडली गा रीतभात घेतला वसा तुझा
तूच वाट दाखीव गा खेळ मांडला
दावी देवा पैलपार पाठीशी तू रहा उभा
हयो तुझ्याच उंबऱ्यात खेळ मांडला."

कितीही संकटे आली तरी परंपरा कधी माझ्या शेतकऱ्याने तोडली नाही अन् अन्नदात्याचा घेतलेला वसाही सोडलेला नाही.
शेतकरी देवाकडे कसलीही तक्रार न करता मागणी करतो की आयुष्याचा हा खेळ तुझ्याच उंबऱ्यात मांडलेला आहे. तुच आता आमच्या पाठीशी उभा रहा,अन् जगण्याच्या वारीत आता आम्हांला योग्य मार्ग दाखव तरच आमचे जीवन सुखद होईल.

"उसवलं गणगोत सार,आधार कुणाचा न्हाई,
भेगाळल्या भुईपरी जीन अंगार जिवाला जाळी."

अडीअडचणीच्या काळात सगेसोयरे दूर जातात. आता माझे गणगोतच उसवलं आहे. जमीनीला पडणाऱ्या भेगा जणूकाही आता काळजालाच पडल्या आहेत.

"बळ दे झुंजायला किरपेची ढाल दे,
इनविती पंचप्राण जिव्हारात ताल दे."

आता या पंचप्राणानेच देवाला विनवणी करताना शेतकरी म्हणतो की लढण्यासाठी आता ताकद दे.अन् तुझ्या कृपेची ढाल सदैव आमच्यावर राहू दे.

"करपलं रान देवा,जळलं शिवार
तरी न्हाई धीर सांडला खेळ मांडला"

आयुष्याने खूप चटके दिलेत,सारं रानचं जणू करपले आहे अन् स्वप्नाचे शिवारही जळाले आहे.पण तरीसुद्धा माझा धीर कायम आहे.
आणि हा आयुष्याचा खेळ मी आता जिद्दीने खेळणार आहे.

शेतकऱ्याचे आयुष्य म्हणजेच एक खेळ आहे.हार किंवा जीत ठरलेली.
दारिद्रय,दुरावस्था अन् नशिबाला दोष देत बसण्यापेक्षा जिद्दीने आयुष्याचा खेळ मांडणारी आणि नशिबा सोबत लढण्याची ताकद देणारी ही कविता शेतकऱ्याची संघर्षगाथाच आपल्यासमोर ठेवते.

गुरु ठाकूर यांच्या शब्दसामर्थ्याला प्रणाम..!!!

संदीप ढाकणे
7588512467
औरंगाबाद

Share

प्रतिक्रिया