नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
** थकले सारे **
थकली पाखरे आकाशी घीरट्या घालुन,
थकली लेकरे कागदी नाव बनवुन.
थकली माय देवांना नवस बोलुन,
थकला बाप नभापुढे हात जोडुन.
थकली जनावर हंबरडा फोडुन,
थकली झाडे एक एक पान गाळुन.
थकली धरनी वर्षाराणीस बोलावुन,
थकले ढग आकाशी फक्त पळुन.
थकले ते डोळे आसवांशा वाहुन,
थकले सारे हात कीर्तन-भजन करून.
थकले पाय ओलाव्याचा शोध घेवुन,
थकले मन पेरनीची वाट पाहुन.
थकले सारे आता दुष्काळ दुष्काळ म्हणुन,
थकले ते कष्ट करणारे हात गळफास घेऊन
प्रज्ञा आपेगांवकर..
प्रतिक्रिया
प्रवेशिकेचे मनपूर्वक
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
अभिनंदन....!
शेतकरी तितुका एक एक!
पाने