नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
** चल चल पावसा **
घाली नभास प्रदक्षणा पाखरांचा थवा
होरपळणार्या देहास तुझा सहवास हवा,
वाटे तुझ्या येण्याची बातमी सार्यास सांगावी
चल चल पावसा चल माझ्या गावी.(1)
दुष्काळाची झळ काळीज स्पर्शवीते
देह घामाने भीजवीते नी मनास जाळीते,
झाला वीस्तव रानाचा तुझ्या अभावी
चल चल पावसा चल माझ्या गावी.(2)
रूसलास तु नी उदास झाली धरने
कीती फोडायचे टाहो सुकी पडली नयने,
कर थोडी जमीन ओली आमच्याही नावी
चल चल पावसा चल माझ्या गावी.(3)
कशासाठी अबोला कोणावरी हा रूसवा
घाम गाळणारा बळीराया हतबल होवोनी बसला,
आग ओकनारी भुमी तुझ्या थंडाव्यात नहावी
चल चल पावसा चल माझ्या गावी.(4)
प्रज्ञा आपेगांवकर.
प्रतिक्रिया
प्रवेशिकेचे मनपूर्वक
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
अभिनंदन....!
शेतकरी तितुका एक एक!
पाने