नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
*विश्वस्तरीय काव्य लेखन स्पर्धेसाठी - २०२४*
*विषय :- शेतमालाचे भाव*
*काव्य प्रकार :- कविता*
*अष्टाक्षरी*
( झाडी बोलीत )
*रोग कोनता होते का*
ढोरं कष्ट करतो म्या
शेत मालं पिकवाले
रोग कोनता होते का
भाव ज्यादाचा देवाले
तुरी वरीन पेरल्या,
टोबलून पराटीले
भाव वदारून देवा
ठेव जित्ता आवत्याले
भाव वाढतले पीक
जागा नाई गा ठेवाले
घरामंदी मया जागा
हाये उलीसी रावाले
डेर,, मयाल मोडली
कसा सावरू आड्याले
ईना घातच्या पान्यानं
घर लागला गराले
खोल खोदली ईहीर
किव नाई दगडाले
झरा लागलास नाई
धारा लागल्या डोऱ्याले
गाटे खनलो खारीत
वल्ली हरद लावाले
अम्दा मजव्या पोरीचे
हात पिवरे कराले
कसा बसा कात् अम्दा
बार आला वांगुड्याले
आना् अम्दाच्या माससं
तेल नाई सातराले
हरबरा मुंग तिर
पेरलो म्या कटानाले
भाव बेस रायतेत
तेल बिया जवसाले
खात सिपला नाई त्
लाल्या चल्ला गा धानाले
उंबयास आल्या नाई
पानी नाई त् गव्हाले
जागा पडिक ठेवलू
बैलं ढोरालं चराले
नाई तनीस कडबा
दमनीच्या पाटव्याले
सेर-पसा पेरतू गा
पीर देवून पोटाले
पिकवतो आमी आना्
लोब्ते येते भाव द्याले
✍️
सुनिल बावणे - निल
बल्लारपूर, चंद्रपूर
८३०८३३४१२३