नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
@दूर ढगांना पाहून@
किती दिवसांनी आज
ऐकू आला गाजावाजा
दूर ढगांना पाहून
सुखावला बळीराजा
माना टाकलेली पिके ,
मेथी,पालकाची भाजी
दूर ढगांना पाहून
झाडे झाली ताजी ताजी
उल्हासली गुरेढोरे ,
कुरणातली कोकरे
दूर ढगांना पाहून
आली भरात पाखरे
आता वाजविल पावा
वारा होऊनिया कान्हा
सरीँवर सरी येता
नद्या सोडतील पान्हा
सांज मंजुळेल आता
गार होईल दुपार
आणि कष्टाचाच
घाम सुख देईल अपार !
- राजीव मासरूळकर
मासरूळ ,ता जि बुलडाणा
प्रतिक्रिया
दूर ढगांना पाहून
खूप सुंदर.
हेमंत साळुंके
अभिनंदन.
रचना उत्तम आहे. स्पर्धेतल्या पुरस्काराबद्दल अभिनंदन. http://maymrathi.blogspot.com/
पाने