नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
शेतकरी जिणे.
बरसले पाणी
गाई वारा गाणी
आशेवर गांव
करतो पेरणी
अर्ध्यात पाऊस
गायबच झाला
हिर्वा हिर्वा उस
बघ कडू झाला
अश्या आड़वेळी
कोण देतो हात
हाताशी आलेली
करपली पात
नाही आले ध्याना
गोठला हा श्वास
आड्यातला दोर
कधी झाला फास
पुनः आले पाणी
खुणावी ती गाणी
दिसेना तो आता
कुंकवाचा धनी
आठवण झाली
झाली खुप की हो!
पाडसं गोठयात
रोज फोड़े टाहो
अर्ध्यातून गेला
निघोनिया बाप
शेतकरी जिणे
जन्माचा का शाप?
- प्रशांत पनवेलकर
वर्धा.
-------------------------
(षडाक्षरी)
प्रतिक्रिया
सुरेख कविता.
सुरेख कविता.
शेतकरी तितुका एक एक!
अभिनंदन.
रचना उत्तम आहे. अप्रतीम रचना. स्पर्धेतल्या पुरस्काराबद्दल अभिनंदन. http://maymrathi.blogspot.com/
पाने