![]() ![]() बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
शपथ घेऊन सांग स्वातंत्र्या*
कुठे बसला आहेस लपून सांग स्वातंत्र्या
मिटले डोळे नीट उघडून सांग स्वातंत्र्या
स्वातंत्र्याला नसते चव की असते स्वादिष्ट
या जिभेला चोरून लपून सांग स्वातंत्र्या
फळाफुलांनी लदबदलेला जादुई शिवार
का तू पळतो तोंड लपवून सांग स्वातंत्र्या
मातीमधल्या श्रमस्वेदाची ऍलर्जी तुला
सत्य काय ते शपथ घेऊन सांग स्वातंत्र्या
परजीवी अन परपोषींचा बटिक का झाला
अभय मनाचा हिय्या करून सांग स्वातंत्र्या
गंगाधर मुटे "अभय"
=^=^=^=^=