नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
लेखनस्पर्धा 23 गझल
आभाळाचे स्वप्न....
आभाळाचे स्वप्न हरवले गवसत नाही
कोंब कोरड्या मातीमधुनी उगवत नाही
जुनी गोधडी आजीसोबत पुरली होती
ऊब एकटी माझ्याभवती फिरकत नाही
जिथे फाटले, तिथे घालते टाके बाई
विण हृदयाची तिच्या कधीही उसवत नाही
वेडी झाली नुसती धावत आहे दुनिया
क्षणभर कोणी कोणासाठी थांबत नाही
किती जशीच्या तशीच आहे अजूनही ती
या देशाची वैचारिकता बदलत नाही
निशा डांगे/नायगांवकर
पुसद
प्रतिक्रिया
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत. अभिनंदन....!
शेतकरी तितुका एक एक!
लेखन छान आहे पण "शेतकऱ्यांचा
लेखन छान आहे पण "शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयाशी मिळतेजुळते आहे असे वाटत नाही.
पाने