कोरोना माहात्म्य ||१५||
बाहुलीच्या खेळासारखा लॉकडाऊन नकोच
वाढता कोरोनाचा विळखा लक्षात घेता आता बाहुलीच्या खेळासारखा लॉकडाऊन परिणामकारक ठरण्याची शक्यता नाही. त्यातही विरोधी पक्षनेत्याने "लॉकडाऊन नको" अशी बालिश विधाने केल्याने बाहुलीच्या खेळासारखा लॉकडाऊन सुद्धा जाहीर करायला विलंब झाला.
आता जनतेला आपापल्या घरीच थांबा यासारखे प्रेमाचे आवाहन करून काही साध्य होईल असे वाटत नाही. १५ दिवसाचा कडक लॉकडाऊन हवा. न ऐकणाऱ्याच्या पार्श्वभागावर फटके हाच त्यावर सर्वोत्तम मार्ग आहे. या फटक्यांचा निषेध करायला कुणी मानवाधिकारवाला आला तर त्यालाही फटके...
कोरोना उद्रेकाच्या काळातही निवडणूक सभा घेऊन कोरोनाचा सढळ हाताने घाऊक प्रमाणात प्रसार करणाऱ्या राजकारणापायी पिसाळलेल्या नेत्यांना फटके हाणण्याची कुवत आम जनतेने दाखवायला हवी होती पण आम जनताही राजकारणापायी पिसाळली असल्याने त्यांना तसे धाडस दाखवता आले नाही याउलट आपापल्या पक्षाच्या नेत्याचे समर्थन करण्याचेच पातक जनतेने केले...... त्यामुळे..... आता फटके खाण्याची पाळी जनतेचीच आहे.
असे काही करण्याची सुबुद्धी याक्षणी सुचली तरच काही प्रमाणात कोरोनावर नियंत्रण मिळवणे शक्य आहे. नाही तर "स्मशान दूर नही है"
"ते रमजान साजरा करताहेत म्हणून हे कुंभमेळ्याचे समर्थन करत आहेत.... आणि.... हे कुंभमेळ्याचे समर्थन करत आहेत म्हणून ते रमजानचे समर्थन करत आहेत" असे आज चित्र उभे राहिले आहे देशभर..
लोक राजकारणापायी पिसाळले आहेत म्हणून कोरोनाचा विळखा वाढत आहे.
जात्यंध, धर्मांध, पक्षांध व राजकारणांधतेपायी गमावलेले तारतम्य पुन्हा प्राप्त होईल असे काहीतरी करायला तयार व्हा... किंवा.... आपापल्या आप्तेष्ठांना कोरोनापायी गमवायला तयार व्हा. जीव आणि जिव्हाळा तुमचा..... त्यामुळे निर्णयही तुमचाच!
- गंगाधर मुटे आर्वीकर
(क्रमशः)
=============
या लेखमालेतील इतर लेख
==============