IT कार्यशाळा - मोबाईलसाठी काही महत्वपूर्ण फिचर - भाग-६
Sync Device Contacts -
अनेकदा मोबाईल अकस्मात खराब झाल्यास किंवा सिस्टीम हँग होऊन फॉर्म्याट मारावा लागल्यास मोबाईल मधील सर्व साठवलेले मोबाईल नंबर पुसले जाऊन नष्ट होतात. त्यावर साधा सोपा पर्याय असला तरी अनेकांना त्याविषयी माहिती नसते. आपण आपले Contacts गुगल सर्व्हिसशी Sync केल्यास आपले सर्व कॉन्टॅक्टस गुगल Drive वर सेव्ह होत राहतात. सूक्ष्मशा बदलाची सुद्धा नोंद होत राहते म्हणजे आपण एखादा जुना नंबर सुद्धा एडिट करून त्यात बदल केला तर तो त्या बदलाची नोंद घेऊन माहिती अपडेट करत राहतो. आपला इमेल आयडी ज्या ज्या डिव्हाईस मधील Gmail मध्ये लॉग इन असेल त्या सर्व डिव्हाईस मध्ये हि माहिती पाहता येते.
उदा. - समजा माझ्याकडे ४ कॉम्पुटर, ३ लॅपटॉप, २ टॅब आणि ६ मोबाईल असेल आणि त्या सर्व डिव्हाईस मधील Gmail मध्ये मी जर एकाच ईमेल आयडीने लॉग इन केले असेल तर त्या सर्व डिव्हाईस मध्ये मला एकसमान कॉन्टॅक्ट लिस्ट बघता येते. शिवाय वरील कोणत्याही एका डिव्हाइसमध्ये मी नवीन नंबर ऍड केला तर काही मिनिटाच्या आत मला तो नवीन ऍड केलेला नंबर अन्य सर्व डिव्हाइसवर उपलब्ध होतो.
चला तर Sync Device Contacts कसे करायचे ते बघुयात.
१] सेटिंग्ज आयकॉनवर
क्लिक करा.
२] Accounts and Backup वर क्लिक करा.
३] Accounts वर क्लिक करा.
४] Sync Account वर क्लिक करा.
५] आता आपल्याला काय काय Sync करायचे याचा मेनू दिसेल.
६] त्या मेनुतील ज्या-ज्या सर्व्हिसेस Sync करायच्या आहेत. त्या-त्या सर्व्हिसेस On करा.
(मोबाईल कंपनी, मॉडेल आणि अँड्रॉईड व्हर्जनमुळे वरील कृतीमध्ये थोडाफार बदल संभवतो.)
आपल्या खात्यातील ज्या सर्व्हिसेसना तुम्ही on केले आहे..... त्या सर्व्हिसेस Sync होणे सुरु होतील. Sync होण्याची प्रक्रिया पूर्ण झाली की तुमचे कॉन्टॅक्टस Sync झाल्याचा शेवटचा टाईम तेथे नोंद झाल्याचे आपणास दिसून येईल.
कृपया लक्षात घ्या कि टेक्नॉलॉजी कळेपर्यंत फारच अवघड आणि किचकट वाटते... पण.... एकदा कळली की फार...फार... फार सोपी-सोप्पी वाटते. त्यामुळे सुरुवात चिकाटीने करा व काम पूर्ण होईपर्यंत चिकाटी टिकवून ठेवा. हिंमतीला खचू देऊ नका. तिला "बेगण्या" लावत राहा.
(बाकी महत्वपूर्ण अन्य फीचरविषयी माहिती नंतर.)
- गंगाधर मुटे
=======