Ramram नमस्कारRamram
बळीराजावर आपले स्वागत आहे.

लेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून  मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. साईटवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा
बळीराजा डॉट कॉमवर वाचा
कविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......
शेतकऱ्यांची चावडी shetkari dot in

आजच चॅनेल LIKE करा, SUBSCRIBE करा आणि बेलच्या आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन ऍक्टिव्ह करा.
SUBSRIBE करण्यासाठी youtube.com/@chawdi किंवा www.shetkari.in या लिंकवर क्लिक करा.
***

आजचे बाजारभाव

आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.




गावात कोरोना आला अन् पेरा गेला ।।

लेखनविभाग: 
ललित लेखांचे समीक्षण

लेखनस्पर्धा -
ललित लेख -विभाग
************************

गावात कोरोना आला
अन् पेरा गेला............!!
!!!!!!!!!!!!!!!
० डॉ. संगीता घुगे
मराठी विभाग प्रमुख
यशवंत महाविद्यालय, नांदेड.
--------------------------------
राजू पळत - पळत घरी आला.त्याला आता दम लागला होता. चावडीवरच्या गप्पा त्याने ऐकल्या होत्या.त्याला मनात भीती वाटत होती. आपल्या आईला शुगर आहे, त्यामुळे तो घरी येऊन आईला जप म्हणून सांगत होता. गावात सखाराममुळे कोरोना आला होता.सखाराम पुण्याहून गावात राहायला आला होता. आला तेव्हा त्याला कोणतेच कोरोनाचे लक्षण दिसत नव्हते, पण आता मात्र त्याची टेस्ट करण्यात आली होती व त्याला कोरोना झाला होता.
सार गाव त्याच्याकडे एका वेगळ्याच नजरेने बघत होते.सखारामही स्वतः स दोषी मानत होता.आपल्यामुळे कुणाला त्रास नको म्हणून तो खबरदारी घेत होता.त्याच्या आई, वडीलाच्याही टेस्ट करण्यात आल्या होत्या . त्यांनाही कोरोनाची लागण झाली होती.आता तर गावात अजून भीती निर्माण झाली होती.
सखाराम व त्याचे आई ,वडील तालुक्याच्या गावी दाखल झाले होते.त्याच्या आई वडिलांची तब्येत चिंताजनक होती.त्यामुळे सखाराम मनोमन देवाचा धावा करत होता.अधून मधून मित्रांचे कॉल येत होते.सर्व जण तब्येत विचारत होते.सखारामला जास्त त्रास होत नव्हता ,पण आई ,वडील परेशान होत होते,श्वास घेण्यास त्रास होत होता.डॉकटर प्रयत्न करत होते.सेंटरवर सर्व सुविधा दिलेल्या होत्या.सखाराम डॉकटरसोबत चर्चा करत होता. वेळेवर डोस दिला जात होता.गावातील मित्रांना सखाराम कॉल करून सांगत होता.
"काळजी घ्या .मी कोरोनावर मात करून,आई, वडिलांची तब्येत बरी करून आणणारच, अस तो सांगत होता.तुम्ही घाबरु नका. मनाने कमजोर होऊ नका ."
इकडे आई, वडिलांची व सखाराम ची तब्येत सुधारत होती.त्यामुळे आता बरे वाटत होते. कोविड सेंटरच्या यादीत नाव आले होते .
उद्या सकाळी सर्वांना डिस्चार्ज देण्यात येणार होता.आज हातावर स्टॅम्प मारला होता.सगळ्या टेस्ट परत केल्या होत्या.नॉर्मल सर्व टेस्ट आल्या होत्या.
आज सकाळीच चुलत भाऊ कार घेऊन आला होता. सारे सामान गाडीच्या डिकीत टाकून ,सेंटरच्या सर्वाचा निरोप घेऊन हे सारे गाडीत येऊन बसले.गाव पंधरा किलोमीटर अंतरावर होते.सेंटर मध्ये हे दिवस कसे गेले ते कळले नाही.नवीन मित्र झाले.आपसात प्रेम निर्माण झाले.बोलण्यात केव्हा गाव आले ते कळलेच नाही.सर्व गाव वेगळ्याच नजरेने यांना पाहात होते.आपली माणस परकी झाली होती.मन गहिवरून आले होते.आई ,वडिलांची तब्येत चांगली झालेली पाहून लोकांना बरे वाटले पण सारे दुरूनच बोलत,बघत होते.सखाराम गाडीतून घरासमोर उतरला,आई वडिलांना
हाताला धरून उतरविला.सामान काढले.घरात ठेवले.सर्वांनी स्नान केले फ्रेश झाले.गावकरी शापित नजरेने पाहत असल्यामुळे सखाराम कुणालाही बोलला नाही.आपल्यावर वेळ आहे.सर्व ठीक होईल.हे पण दिवस जातील म्हणून पुस्तक वाचू लागला.पुतण्याच्या बायकोने जेवण आणल सर्व जण जेवण करून आराम करू लागले.
गावात आता रोज रुग्ण निघू लागले.सारे खापर सखारामवरच गाव काढत होते. कुणी
सखारामला धीर देत नव्हते.
सखाराम व त्याचे आई, वडील यशस्वी रित्या कोरोनावर मात करून गावात आले होते.सखाराम सुशिक्षित मुलगा होता. तो पुण्यात एका कंपनीत इंजिनियर होता.आपण आता गावाकडे आलोत कोरोनावर विजय मिळवून, तेव्हा गावकऱ्यांना या आजाराविषयी माहिती द्यावी असे मनातून वाटत होते,पण लोक त्याला जवळही येऊ देत नव्हते.
घरात बसून साऱ्यांना कंटाळा आला होता म्हणून आज सर्व जण शेतात गेले. मुग,उडीद
काढण्यासाठी आई सज्ज झाली.
वडीलही आईला मदत करू लागले ,पण यावर्षी पाऊस खूप पडला,सतत पडतच आहे. त्यामुळे हे दोन्ही पीक हातची गेली होती.आई व वडिलांच्या डोळ्यात पाणी आले. या शेंगाला बुरशी आली होती. काही शेंगा जमिनीत गेल्या होत्या. पिकाचा खर्च ही निघाला नव्हता.
सखारामला काहीच कळत नव्हते, तो आई ,वडिलांकडे पाहात राहिला.
दुपारची जेवण झाली.सखाराम आईला म्हणाला,"आई काय झाले होते ग रडायला."
तेव्हा आई म्हणाली,
"बाबा पाऊस यंदा खूप झाला. मुग,उडीद ही पीक गेली.
, , बघ ना या शेंगा. बुरा आला. या पिकाचा खर्च नाही निघाला आपला नि परत अनावर झाली.त्यात हा कोरोना आपल्या घरात आला. यंदा कस होणार आपल?मोठी आशा होती रे."
सखारामला आता कळले की आई ,वडील का रडले ते.त्यालाही रडू आले.तो आईच्या कुशीत जाऊन जोराने रडला.आपण पुण्यात होतो.तिकडे आपणास गावचे,घरचे काहीच कळत नव्हते. ज्या कोरोनाने आपल्याला गावात आणले.त्यामुळे हे सारे कळले,आपल्याला आई,
वडिलांनी कधीच काही सांगितले नाही.
किती हे दुःख आहे.तुमचं जीवन अवघड आहे.
"काळजी करू नका.माझ्याकडे जे पैसे आहेत ते तुमचेच आहेत."
अशी समजुत सखाराम आपल्या आई ,वडिलांची काढीत होता.हे पैसे तुमचेच आहेत म्हणून दिलासा देत होता.तुम्हाला किती हवे ते घ्या ,पण तुम्ही दुखी असे होऊ नका.मी आहे ना...!
कोरोना गावात आला नि शेतीचा असा पेरा गेला.मी तुमच्यासाठी,गावासाठी काही तरी केले पाहिजे.
सखाराम गावच्या सरपंच व पोलीस पाटलाकडे गेला.गावात कोविड सेंटर चालू करण्यासाठी सखारामने सर्व मदत केली.लोकांना विनामूल्य उपचार मिळायला लागला.गावात सखारामबद्दल आदर निर्माण झाला.त्याची नोंद शासन पातळीवर घेतली गेली व गावकऱ्यांनी सखारामचा सत्कार केला,ही बातमी आज टीव्हीवर दिवसभर झळकत होती, सखाराम चे मन आनंदाने भरून आले.....!!!

Share

प्रतिक्रिया