नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
कास्तकारीचा राजीनामा
कोरडा दुष्काळ असतो
कधी ओला दुष्काळ भाळी
दुबार पेरणीचं
नेहमी संकट छ्ळी
बॅकायचे काटून चक्कर
मन हे विटून जातं
सावकाराचं शेकड्यानं
कर्ज घ्यावं लागतं
पिकत नाही शेत
निसर्गाच्या लहरीपणानं
कर्ज तेवढं पिकतं
विना खत पाण्यानं
उसनं पासनं आणून
पोटात लेकरायच्या घालतो
तुम्ही म्हणता साला
हा फालतूचा रडतो
भाव माह्या मालाचा तुम्ही
पाडता ईंन तेवढा पाडता
मॉल बार मध्ये खिशे
रिकामे करून बाहेर पडता
फाटके कपडे आमचे
नाही उतरले कधी अंगाहून
तुमची सदाच रोषणाई
गेली माही दिवाई
शेतकरी राजा म्हणून
किती राजे हो छळता
गिधाडावाणी रोज लचके
मेल्या ढोरायचे तोडता
सुटलं शिक्षण पोरायचं
नाही पैसा पोर उजवाले
कोणापुढं मांडू दैना ?
आहे कोण रिकामं
ऐकाले?
लागला जीव झुरणीला
कवटाळतो रोज मरणाला
पाहतो रोज समोर
मीच माझ्या सरणाला
आता स्वतःच पिकवा राजे हो
आम्ही जंगलात जातो
कास्तकार पदाचा येथे
बिनशर्त राजीनामा देतो
कवी
लक्ष्मण लाड
परळी वै . जि.बीड
मो. ९८५०५६९१३२
प्रतिक्रिया
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत. अभिनंदन....!
शेतकरी तितुका एक एक!
स्पर्धाविजेती प्रवेशिका.
स्पर्धाविजेती प्रवेशिका. अभिनंदन....!
शेतकरी तितुका एक एक!
पाने