नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
शेतकरी ( एक न सुटणारे गणित)
शेती आमचे काम त्यावरच आमचे जीवन....
गाळावा लागतो घाम तरच मिळतो भात-वरण....
घेतो ग्राहक पिझ्झा २५० रुपयाला....
पण तो आमची भाजी मागतो १० ची ५ रुपयाला....
आम्ही गरीब शेतकरी व्यवसाय करतो प्रामाणिकपणे....
ग्राहक मात्र हॉटेलात चालू ठेवतो टीपदेणे....
शेती आमची अवलंबून असते या पावसावर....
कितीही प्रार्थना केली तरी पडत नाही तो वेळेवर....
सावकारचं वेगळेच लोढणे असते आमच्या गळ्याशी....
दगाबाजी झाली तर जमीन जाते त्याच्या घश्याशी....
संकटे आली तर चारही बाजुंनी एकाच वेळी येतात....
वाचवायला तेव्हा कोणीही नसतं सर्व पटकन दूर जातात....
नेहमीच सरकार सांगते आम्हाला मदत ते करणार....
त्यांची मदत मिळेपर्यंत आयुष्य आमचं इथेच संपणार....
जीवन शेतकऱ्यांचे नाही चालत कधीही सुरळीत....
कोणीही सोडवणार नाही असे आहे हे कठीण गणित....
© कॉपीराइट्स
कविता- लेखक: श्री. भूषण सहदेव तांबे
ई-मेल आयडी: bhushanstambe@yahoo.co.in
प्रतिक्रिया
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत. अभिनंदन....!
शेतकरी तितुका एक एक!
पाने