नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
कोण जाणे
कष्ट केले मी अपार,सोसुनिया मार
कसा चालतो संसार,कोण जाणे!
ऊन वारा न् पाऊस,कष्ट करण्याची हाऊस
कसा काढतो काऊस,कोण जाणे!
नजर पडली दुष्टांची,नातं जुळलं चेष्टांशी
किंमत माझ्या कष्टाची,कोण जाणे!
पोरं ती शिक्षणाची,मुलगी आहे लग्नाची
काळजी त्यांच्या रक्षणाची,कोण जाणे!
कर्जमाफीचा धडा,आहे कितवा तो धडा
कधी होणार सातबारा कोरा,कोण जाणे!
आखूणी धोरण,किती रचले सरण
कधी थांबेल मरण,कोण जाणे!
- रंगनाथ तालवटकर
चिखली(कोरा)
जि.वर्धा
प्रतिक्रिया
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत. अभिनंदन....!
शेतकरी तितुका एक एक!
पाने