![]() ![]() बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
हताश औदुंबर
ऐल तीरावर लाल शिरावर,लुकलुकता घेऊन
निळा पांढरा थवा चालला, रजःकण पांघरून
ढोलं-चौघडे, बोल बडबडे, खाकी गर्दी पुढे
सरावल्यांची पोपटपंची, गगन भेदुनी उडे
पैल तीरावर पत्र घरावर, तुळशीचे ठेवून
बेत शिजविला,देह निजविला, काळघुटी घेऊन
अभागीनीचे कुंकूम पुसता, अचेतन ती पडे
पोशिंद्याचा बाळ भुकेला, तिच्या उराशी दडे
दोन तीरांना अभये धारा, विलगे निरंतर
पाने गाळुनी मुंडण करितो, हताश औदुंबर
गंगाधर मुटे 'अभय'
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
("त्या" सर्व हजारो स्वर्गिय शेतकर्यांना
भावपुर्ण श्रद्दांजलीसह सादर समर्पित.)
प्रतिक्रिया
अप्रतिम
निःशब्द सर!
Pradip
नि:शब्द औदुंबर
"पोशिंद्याचा बाळ भुकेला, तिच्या उराशी दडे"
क्या कहने सर...!
R.A.Burbure
हताश औदुंबर
काय म्हणावं सरं. अगदी निःशब्द करून टिकणारी अशी ही काव्य रचना आहे आपली. "दोन तीरांना अभये धारा, विलगे निरंतर.. " अप्रतिम सर!
Dr. Ravipal Bharshankar
खुप छान सर !
खुप छान सर !
अप्रतिम रचना सर
ही रचना साकारताना तुमच्या अभिव्यक्तीच्या खोलीचा अंदाज येतो. जबरदस्त विरोधी रंगसंगतीतून अभिव्यक्त छंदमुक्त रचनेस सलाम.
अप्रतीम कविता साहेब
अप्रतीम कविता साहेब
पाने