नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
घोर जीवाचा पाहिल्या जाईना
तुझ्यापायीच झाली ही दैना ।।धृ।।
ही आहे व्यथा। माझ्या शोषणाची। पीलाच्या पोषणाची। नकली घोषणाची। शेतीच्या कुपोषणाची।
काळ्या मातीची। अंकुरल्या शेतीची। कष्टकऱ्या जातीची। मानी बसल्या ओझ्याची।
दमा दाटल्या छातीची। वाया गेल्या कर्माची।
आशा मिटल्या फळाची। राहिलीना किंमत मानाची।
कथा मिळकती पेक्षा मेहनतीची। तरी वेळ आली आज लाचारीची। ना संपणाऱ्या काळ रातीची | फडफडणाऱ्या वातीची।
व्यर्थ तुझी माझी साथ। नुसत्या दुःखाची वरात।
शेती आहे जवरी गहाण। कधी मिटणार आहे ताण। कधी जाईल माझा प्राण।
उभ्या झाडास पालवी येईना ।
तुझ्यापायीच झाली ही दैना ।।१।।
ही आहे व्यथा। शेतकऱ्याच्या आत्महत्येची | जीवघेण्या राजसत्तेची। कर्जात बुडल्या मालमत्तेची।
शेतकऱ्याच्या अधोगतीची।
ना मिळाल्या तंत्रज्ञानाची। खोट्या संशोधनाची। उणीव नवनवीन वाणाची। शासकीय अनुदानाची। सिंचनाच्या पाण्याची। राजाश्रयाच्या छत्रछायेची। माणसाच्या मायेची। लोकशाहीच्या छायेची। शेतकऱ्यांस छीन्न छीन्न केल्या बाणांची। शेतीत गमावल्या प्राणांची। देवून तुला माझा हात। झाला माझा घातपात।
सुटणार आहे ग्रहण। किती करावे सहन।
झाल्यावर माझे दहन।
वारे दिल्लीतले येथे वाहीना ।।२।।
तुझ्यापायीच झाली ही दैना
प्रतिक्रिया
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
अभिनंदन....!
शेतकरी तितुका एक एक!
तुझ्यापायीच झाली ही दैना
मस्त लोकगीत, धीरज साहेब.
Pradip
पाने