![]() ![]() बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
हे विठूचे रान आहे
या भुईची जाण आहे हे विठूचे रान आहे
बाप माझा शेतकरी शेत तयाचे प्राण आहे
कष्ठकरी तो वारकरी प्रारब्धाचे नांगर धरी
काल पडीत रान होते आज ओले दान आहे
या विठूच्या पायाखाली भक्तीची ती वीट आहे
शेतकऱ्याची काळी माय सोन्याची खाण आहे
विठू रानात दिसतो मला हिरव्या दाण्यात दिसतो
तो किर्तनात पेरतो भक्ती रसाचे ज्ञान आहे
जीवावर बेतते जेंव्हा डंक देते मधमाशी
जपल्या गोडव्याचे माणसाला कुठे भान आहे
काहीच नाही हाती केवळ इथे जपावे नाती
जीर्ण निष्पर्ण झाडांचा मी पिकले पान आहे
शेत आहे पंढरी तरी का चढतो फासावरी
मालास भाव नाही इथे कुणाला जाण आहे
तू इथे पोशिंदा जरी मग तुपाशी कोण आहे
जर जगवतो जगाला मी माझे कुठे स्थान आहे
प्रतिक्रिया
बळीराजा
खूप छान
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत. अभिनंदन....!


शेतकरी तितुका एक एक!
लेखन छान आहे पण "शेतकऱ्यांचा
लेखन छान आहे पण "शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयाशी मिळतेजुळते आहे असे वाटत नाही.
पाने