नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
(मतला)
फळली मला कधीही नाही कृषी मुळावर.
मारूनही फवारा पडली अळी फुलावर.
(हुस्नेमतला)
कर्जास या अता मी फेडायचे कशावर.
लागत तरी निघाली नाही कुण्या पिकावर.
(१ ला शेर)
जीएम बी बियाणे पेरायला मनाई,
शेती कशी करावी या तुगलकी तिरावर.
(अंतिम शेर)
जर रास्त दर मिळाला मालासही कृषीच्या,
मरणार मी कशाला लटकूनिया सुळावर.
(मक़ता)
'रविपाल' कर अता तू सरकारची अवज्ञा,
धोरण अरे तयाचे उठले तुझ्या जिवावर.
~ गज़लकार: डॉ. रविपाल भारशंकर.
°°°
निर्वाहन:
ही एक क्लासीकल गज़ल असून तित खालील आवश्यक बाबींचा निर्वाह केला आहे.
१. गज़ल तंत्र: कलामे-मौज़ूँ-मुक़फ़्फा-बिल्क़स्द.
२. शेर- तंत्र: सदर, उरूज; इब्तिदा, ज़र्ब.
अ) कलापक्ष
१-अ) बेसीक अरकान: [मस-तफ़-इ-लुन(२-२-१-२), फ़-ऊ-लुन(१-२-२)]×२, किंवा [(गागालगा), (लगागा)]×२.
२-अ) फ़ारशी बहर-ए-मज़ार ची मुज़ाहिफ़ सूरत किंवा वृत्त: आनंदकन.
३-अ) बहर/वृत्त निर्वाह: गण (अऱकान) भंग न करता लयबद्ध शिल्पवत साकार.
जशे:-
[(मारूनही)( २२१२),(फवारा१२२)],
[(पडली अळी)(२२१२),(फुलावर)(१२२)], इ.
४-अ) तक़तीअ (मात्रा गणन): उच्चारानुसार. जशे:-
तुगलकी= तुग-ल-की= तफ़-इ-लुन= २१२√, १२२×, इ.
५-अ) शेर- विषय: भिन्नता शर्त.
जशे:-
मतला: शेतकऱ्याची हताशा,
हुस्नेमतला: शेतीतील घाटा,
१ ला शेर: सरकारचे तुगलकी धोरण,
अंतिम शेर: शेतीची रास्तभाव विषयक समस्या,
मक़ता: शेतकऱ्यांवरील अन्याया विरूद्ध आक्रोश.
६-अ) गझल- चित्तवृत्ति एकता: ही वैकल्पिक शर्त शेरांची स्वतंत्र ईकाई कायम ठेवून राखली आहे : शेती विषयक
ब) भावपक्ष
१-ब) मुहावऱ्यांचा वापर: बोल-भाषा शब्द संगती.
जसे:-
जिवावर उठणे, अळी पडणे, फवारा मारणे, इ.
२- ब) उक्ती- वैचित्र्य, अलंकरण:
जशे:-
"फळली मला कधीही नाही कृषी मुळावर
मारूनही फवारा पडली अळी फुलावर"
यात, मुळावर(पूर्णपणे/मूलभूतपणे), फुलावर, ई.
३-ब) अलिंगनबद्ध मिसरे: चित-पट प्रमाणे
जशे:-
जर रास्त दर मिळाला मालासही कृषीच्या
मरणार मी कशाला लटकूनिया सुळावर
४-ब) नजीक तर्कसंगती: दुरची कौडी नाही.
जशे:-
मारूनही फवारा पडली अळी फुलावर, इ.
५-ब) पद्यात्मकता: कर्ता उप-स्थिती (secondary)
जशे:
मरणार मी, फळली मला, इ.
६-ब) भर्तीचे शब्द नाही: अत्यावश्यक शब्द वापर.
७-ब) आशय स्पष्टता (बिल्क़स्द): जे म्हणायचे ते निश्चित कथन.
८-ब) काळ-अभंगता. काळभंग केलेला नाही.
९-ब) मेळपुर्ण संबोधने: एकाच ठिकानी एखाद्यास एकेरीत व दुहेरीतही असे संबोधन नाही.
१०-ब) प्रमुदित अभिव्यक्ती: साधी सरळ संयत.
क) सादरीकरण
१-क) राग अहीर भैरव आधारित स्वतंत्र तरन्नुम.
आपला नम्र,
डॉ. रविपाल भारशंकर
प्रतिक्रिया
Khul chhan sir
Khul chhan sir
धन्यवाद महेश.
आणि हो, तू पण भाग घे हं!
Dr. Ravipal Bharshankar
अप्रतिम सर
अप्रतिम गझल सर जी
R.A.Burbure
धन्यवाद रमेश!
खुप खुप आभार.
Dr. Ravipal Bharshankar
Dhirajkumar B Taksande
आता सरकारची अवज्ञा करण्याची वेळ आली
अप्रतिम गझलेची रचना जबरदस्त आशय.!!!
खुप खुप आभार धिरजभाऊ आपले!
धन्यवाद_/\_
Dr. Ravipal Bharshankar
मस्त
छानच
Pradip
धन्यवाद गांधीजी
आभार आपले
Dr. Ravipal Bharshankar
वाह
वाह सर वाह !
अत्यंत सुंदर गझल !!
मुक्तविहारी
मुक्तविहारीजी धन्यवाद!
मनःपूर्वक आभार आपले!
Dr. Ravipal Bharshankar
सर,तुमची गझल ऐकून
सर,तुमची गझल ऐकून पेरणाऱ्यांच्या मनावर शब्दांचा फवारा बसेलच.पण तूर्तास माझ्या मनावर नक्कीच तुमच्या शब्दांचा फवारा बसला.
धन्यवाद
धन्यवाद राजेश
Dr. Ravipal Bharshankar
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत. अभिनंदन....!
शेतकरी तितुका एक एक!
दिवाळी = बरबादी का जश्न
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र
लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali
***
हवे ते शोधा
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
प्रवेशिका दाखल करण्याची अंतिम मुदत : २४ सप्टेंबर २०२४
=-=-=-=-=
User Details
सदस्य खाते
सदस्य प्रवेश
सध्या साईटवर हजर सदस्य
सध्या बळीराजावर 1 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहे.
अंगारमळा - अंक - १७
अंक वाचण्यासाठी
www.baliraja.com/angarmala
लिंकवर क्लिक करा.
मोबाईल अॅप