![]() ![]() बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
- गंगाधर मुटे
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
माझ्या सर्व मित्र-मैत्रिणींना समर्पित कविता
चेहऱ्यावरती खिळू नकोस
आत उतरून बघ
अंतरीच्या झोपाळ्यावर
मैत्र झुलवून बघ
नितळलेल्या तळावरती
विश्वासाचे घर
हाय, हॅलो जाऊ देत
हात घट्ट धर
अटी-शर्ती काही नकोत
खुले-खुले सांग
तेव्हा तुला कळेल माझ्या
हृदयाचा थांग
दिसतो तसा नाही मी
कठोर आणि क्रूर
काळिजाच्या सप्तकाला
अवरोहाचे सूर
देत बसत नाही मित्रा
पुन्हा पुन्हा ग्वाही
पण तू जसा समजतोस
मी तसा नाही
मोजत बसू नकोस मित्रा
स्पंदनाची धग
डोळे मिटून खांद्यावरती
मान ठेवून बघ
चिंता नकोस करू मित्रा
'अभय'तेने तेव
वादळासंगे लढेन मी
इतका विश्वास ठेव
- गंगाधर मुटे 'अभय'
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
प्रतिक्रिया
व्वा छान
व्वा छान
धन्यवाद
धन्यवाद विनिताजी,
कालच्या मैत्रीदिनाच्या धबडग्यात या कवितेचे मातेरे झाले आहे. या कवितेवर फेसबूक आणि व्हाटसअॅपवर फारसे प्रतिसाद आले नाहीत, याची खंत नाही मात्र ही कविता वाचलीच गेली नाही याची, एवढा अदमास आल्याने जरा हिरमोड झालाच.
यापुढे कोणत्याही दिनाच्या निमित्ताने नवीन कविता लिहायची नाही आणि लिहिलीच तर त्या दिवशी अजिबात प्रकाशित करायची नाही, या निर्णयाप्रत मी आलेलो आहे.
ही कविता उत्कृष्ट कविता आहे, याची माझी मलाच खात्री आहे.
शेतकरी तितुका एक एक!
मैत्रिदिनाच्या मंगलमय शुभेच्छा
मैत्रिदिनाच्या मंगलमय शुभेच्छा
शेतकरी तितुका एक एक!
कवितेचे वाचन
https://www.facebook.com/satish.borulkar/videos/1963372080385847/
धन्यवाद Satish Borulkar सर! माझ्या कवितेचे सोने केलंय तुम्ही!!
शेतकरी तितुका एक एक!
पाने
शेतकऱ्याची चावडी - ताजा vdo-1
कळले, बाकी सब गल्लाभरु
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र
लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali
***
हवे ते शोधा
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या
लोकप्रिय लेखन (वाचनसंख्या)
पाने
प्रवेशिका दाखल करण्याची अंतिम मुदत : २४ सप्टेंबर २०२४
आज सर्वाधिक वाचन
पाने
User Details
सदस्य खाते
सदस्य प्रवेश
सध्या साईटवर हजर सदस्य
सध्या बळीराजावर 0 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.
शेतकऱ्याची चावडी - ताजा vdo-2
शेतकऱ्याची चावडी - ताजा vdo-3
साहित्यिकांना सोलून काढणारे भाषण