नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
एक आणखी झाडावरती लटकून मेला काल
तुझ्या कागदी नियोजनाला भोकामध्ये घाल
पुन्हा एकदा बिनपाण्याने भाजून गेले शेत
एसीमध्ये आखतोस तू सटरमफटरम बेत
तुला दावतो भकासबंजर तू बांधावरती चाल
खते, औषधी, बीज, मजुरी दसपट झाले भाव
वीज, किराणा, डिझेल, डॉक्टर लुटून नेती गाव
अन् तुला पाहिजे स्वस्तामध्ये शेतीमधला माल
शेतपिकाच्या निर्यातीला जगात आहे वाव
बरकत येऊ शकते हे तर तुलाही आहे ठाव
तरी खेळतोस तू शहाण्या का रे तिरपी चाल ?
आयातीवर सूट देऊनी गाडलास तू बळीराजा
म्हणून वाजतो दारापुढती अंत्यक्रियेचा वाजा
स्वदेशीचे ढोंगधतूरे; खातोस विदेशातली दाल
छल कपटाचा नाद सोडूनी भानावर ये आता
'अभय' जाहली जर भूमिकन्या, मरशील लाथा खाता
तुझी हुशारी, अक्कल तज्ज्ञा बेसुरी बेताल
- गंगाधर मुटे ‘अभय’
~~~~~~~~~~~~~~~
बुलडाणा : चार/एक/सोळा
~~~~~~~~~~~~~~~
~~~~~~~~~~~~~~~
फेसबुक VDO लिंक
~~~~~~~~~~~~~~~
By: एबीपी माझा वेब टीम | Saturday, 26 March 2016 1:10 PM
VIDEO: राजीव खांडेकर यांनी सादर केलेली कविता
~~~~~~~~~~~~~~
प्रतिक्रिया
काव्यवाचन
स्वदेशीचे ढोंगधतुरे : नागपुरी तडका
काव्यवाचन : श्री राजीव खांडेकर, मुख्य संपादक, एबीपी माझा
कवी : गंगाधर मुटे
फ़ेसबूकवर VDO बघण्यासाठी लिंक
https://www.facebook.com/gangadharmute/videos/1202161426475210/
शेतकरी तितुका एक एक!
फेसबुक पोस्ट
March 26 at 9:40 AM ·
"तुझ्या कागदी नियोजनाला भोकामध्ये घाल" या कवितेच्या युट्युबवरील vdo
लिंकवर फेसबुकने बंदी घातली आहे.
◼ Ban करावे असे या कवितेत काय आहे? कुणी तक्रार केली असेल तर फेसबुकने शहानिशा का केली नसेल?
◼ ही कविता म्हणजे शेतीचे नुसतेच आर्त नव्हे तर व्यवस्थेला थेट ललकारणारी वीर रसातील आक्रमक शेतकरी कविता आहे.
◼ शेतीच्या अर्थशास्त्राचे सार आणि अर्क आहे हि कविता.
कुणाला अमान्य असेल तर जाहीरपणे सांगा म्हणावे इथेच.
https://www.facebook.com/gangadharmute/videos/2425879450770062/
शेतकरी तितुका एक एक!
फेसबूकने बंदी घातली
Gangadhar Mute is with Ganesh Mute and 6 others.
March 22 at 4:35 PM ·
तुझ्या कागदी नियोजनाला भोकामध्ये घाल - शेतीचे नुसतेच आर्त नव्हे तर व्यवस्थेला थेट ललकारणारी वीर रसातील आक्रमक शेतकरी कविता
कागदी नियोजनाला भोकामध्ये घाल।होळीचा शिमगा।शेतीचा हुंकार
होळी विशेष | एबीपी माझा। राजकीय धुळवड | धुळवडीनिमित्त राजकीय काव्यपंचमी
https://www.facebook.com/gangadharmute/posts/2420201514671189
March 25 at 11:08 PM ·
"तुझ्या कागदी नियोजनाला भोकामध्ये घाल" या पोस्टवर फेसबूकने बंदी घातली.
https://www.facebook.com/photo.php?fbid=2425256317499042&set=a.170375506...
३ वर्षाआधी याच कवितेचा फेसबुकवर टाकलेला vdo
https://www.facebook.com/…/vb.10000044092…/1202161426475210/
जो २५०० दर्शकांनी बघितला आहे,५० लोकांनी शेअर केला आहे, १३३ लोकांनी लाईक केलेला आहे आणि ३० लोकांनी प्रतिसाद दिलेला आहे. हि पोस्ट मात्र कायम ठेवली आहे.
फेसबुकच्या दुटप्पीपणाला काय म्हणावे?
*हाच vdo युट्युबवर ४५,००० लोकांनी बघितलेला आहे.*
https://www.youtube.com/watch?v=445SBnHQZx4
शेतकरी तितुका एक एक!
फेसबुक पोस्ट
March 26 at 9:56 AM ·
फेसबुकने भविष्यात माझ्या कोणत्याच पोस्टवर Ban अथवा बंदी आणू नये. त्यापेक्षा माझे अकाउंट Ban अथवा Block करावे.
© गंगाधर मुटे
https://www.facebook.com/gangadharmute/posts/2425970664094274
शेतकरी तितुका एक एक!
सेन्सॉर बोर्डाची सांस्कृतिक दादागिरी
माझे मित्र गंगांधर मुटे यांची ही कविता केवळ 'भोक' या शब्दाचा भावार्थ न समजणाऱ्या हेन्द्र्या मुर्खोत्तमाच्या रिपोर्टमुळे फेसबुक ब्लॉक झाली असावी.. अन्यथा कुठलाही अश्लील भाव या कवितेत सापडणार नाही. हा केवळ विद्रोह व्यक्त करणारा आक्रोश आहे.. यापेक्षा जहरी शब्दप्रयोग तर कविवैर्य नामदेव ढसाळ यांच्या कवितात सापडेल.. तरीही विजय तेंडूुलकर, पुल देशपांडे सारख्या प्रगल्भ साहित्यिकांनी त्यांचे समर्थन केले. त्यामानाने या कवितेत काहीही नाही.
आपण आजही ही कविता ऐकून ठरवू शकता.. किंबहुना यापेक्षा अत्यंत बीभत्स शब्द प्रयोग करणाऱ्या शेकडो पोस्ट रोज प्रसवत असताना कोणी रिपोर्ट करत नाही..
सेन्सॉर बोर्डाची सांस्कृतिक दादागिरी त्यांची समाजापासून किती नाळ तुटलिय याची साक्ष आहे... यांच्या अश्लीलतेच्या व्याख्याच इतक्या भोंगळ आणि पक्षपाती आहेत कि, त्यात देशातल्या ८० टक्के समाजाची लोकभाषा स्वीकारली जात नाही. प्रमाणभाषा एक मर्यादेनंतर प्रचंड तोकडी पडते, हे सगळ्यांना माहित आहे.
अशा वेळी का म्हणून सगळ्यानी भारत माझा देश आहे म्हणावे ? भारत मन्हा देश का म्हणू नये ? आज उच्चभ्रू समाजातल्या स्त्री/पुरुषांनी .. फक इट.. म्हणणे आम झालेय. पण त्याचे मराठी भाषांतर ऐकवले तर संस्कृतीचे बुरुज ढासळतात. लगेच मुस्कटदाबी सुरु होते.
तर असल्या पाखंडी मानसिकतेचा मी जाहीर निषेध करतो. या चोन्ग्यांनी भावार्थ, लक्षार्थ, शब्दार्थ हे चौथीच्या व्याकरणातले शब्द तरी आठवून पाहावेत... होळीच्या धुळवडीत आपली पिल्लं कोणत्या भद्र भाषेचा प्रयोग करतात हेहि तपासून सांगावे.. मग गंगाधर मुटे यांच्या फक्त भोक शब्दाचा अर्थ लावावा. तशी तर मानवी शरीराला अनेक भोके असतात.. इन्जिनिअरिन्ग मध्ये जॉबला शेकडो भोके पाडली जातात... मधमाशीच्या पोळ्याला हजारो षटकोनी भोके असतात... ती सगळीच बाद करणार काय.. फक्त शब्द मिटवून त्या वस्तू मिटतात काय !
नागपूरच्या साहित्य संमेलनात ज्येष्ठ साहित्यिक रा रं बोराडे सर, एबीपी माझाचे संपादक राजीव खांडेकर यांनी तोंड भरून कौतुक केले होते, याला मी साक्ष आहे. मग आताच असे काय चक्र फिरले..? अरे शब्द नको तर वास्तवातली भोके, भगदाडे पण मिटवा न ! कि एकूण कवितेच्या आशयाने भक्तांचे सिंहासन हादरले..?
.... न
Navnath Pawar
Aurangabad, Maharshtra
Bhausaheb Shelke यांचा प्रतिसाद
दादा खुपच मस्त लिहिले मी जेंव्हा मित्र गंगाधर जी मुटे ची " तुझ्या कागदी नियोजनाला भोकामध्ये घाल " हा शब्द खूप आवडला होता. हा शब्द जर अश्लील वाट्त असेल तर हा शब्द अश्लील नाही तर हा शेतकऱ्यांसाठी वापरला म्हणून अश्लील वाटला असावा असा माझा समज आहे .कारण ज्याला सनी लिऑन ची जाहिरात ही अश्लीलता नसून कला वाटते त्या समाजाला हा शब्द खटक्ण्याइतका वाईट मुळीच नाही .
हा शब्द म्हणजे एक भावना आहे .आपण आपल्या माणसाला समजाऊन सांगतो , रागाउन सागतो तरीही तो समजत नसेल तर त्याला आपण त्याच्यात च जाए म्हणतो .
म्हणून ती एक भावना आहे आणि तिचा सन्मान झाला पाहिजे .
काही लोकांच कसं असत ते कितीही अश्लील बोलले किंवा वागले तर ते मॉडर्न म्हणून मिरवतात आणि सामान्य माणसाने असं काही केले की आगेमोहोळ उठल्यागत करतात कमालच आहे .
- Bhausaheb Shelke
शेतकरी तितुका एक एक!
Ramakant Gore Koker यांचा प्रतिसाद
आम्ही तहसीलदारांना ही कविताच ऐकवून आमचे विधायक काम करून द्यायलाच भाग पाडले.
शेती विषयी नियोजनाचा षंढ पणा मुटे सरांनी समर्थ पणे मांडला आहे.
ज्यांना आपला षंढ पणा माहीत नाही त्यांनी आपल्या बाळाच्या जन्मावर खुशाल पेढे वाटून घ्यावेत.
दुनियेला माहित झालय.
बंदी घालण्यात शहाणपण नाही.
हे का लिहावे लागले याचा शोध घेतलात तर कळेल.
लिहीत राहणार बोलत राहणार.
जय बळीराजा
- Ramakant Gore Koker
शेतकरी तितुका एक एक!
पाने