विश्वस्तरीय लेखनस्पर्धा-२०१५
विषय : मा. शरद जोशी
(लेखन शरद जोशी या व्यक्तीमत्वाशी निगडीत व अधोरेखीत करणारे असावे)
या स्पर्धेचे दोन प्रकार असतील,
गद्यलेखन स्पर्धा-२०१५ आणि पद्यलेखन स्पर्धा-२०१५
१] गद्यलेखन स्पर्धा-२०१५
विभाग : अ) ललितलेख ब) चरित्रलेख क) वृत्तांतलेख ड) अनुभवकथन इ) वैचारिक लेख फ़) मागोवा
२] पद्यलेखन स्पर्धा-२०१५
विभाग : अ) पद्यकविता ब) छंदमुक्त कविता क) गझल ड) गेय रचना/गीत (पोवाडा इत्यादी)
प्रत्येक विभागानुसार प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाचे पारितोषिक दिले जाईल.
स्पर्धेचे स्वरूप थोडक्यात या प्रमाणे:
१) स्पर्धेत भाग घेण्यासाठी आपले स्वतःचे लेखन प्रवेशिका म्हणून देणे आवश्यक आहे.
२) पूर्वप्रकाशित लेखन देता येईल मात्र लेखन प्रताधिकारमुक्त असावे. प्रताधिकारासंबंधी संपूर्ण जबाबदारी लेखक/कवीची असेल. शक्यतो स्पर्धेसाठी अप्रकाशित व नवीन लेखन/कविता द्याव्यात.
३) एक स्पर्धक सर्व विभाग मिळून जास्तीतजास्त कितीही प्रवेशिका सादर करू शकेल. मात्र एका स्पर्धकाचा एकापेक्षा जास्त पारितोषिकासाठी विचार केला जाणार नाही. महत्तम गूण प्राप्त करणार्या रचनेची निवड केली जाईल.
पारितोषिकाचे स्वरूप :
प्रत्येक विभागानुसार प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाचे पारितोषिक दिले जाईल. पारितोषिकाचे स्वरूप मानचिन्ह, प्रशस्तिपत्र व पुस्तके या स्वरूपाचे असेल.
निकाल :
१० नोव्हेंबर २०१५ रोजी अंतिम निकाल जाहीर केला जाईल, तो अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळीच्या
www.baliraja.com या संकेतस्थळावर प्रकाशित केला जाईल.
पारितोषिक वितरण :
सन २०१६ मध्ये होणार्या दुसर्या अ.भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलनात पारितोषिक वितरण केले जाईल. तेव्हा स्पर्धकाला स्वतः किंवा प्रतिनिधीमार्फत पारितोषिक स्वीकारता येईल.
प्रवेशिका सादर करण्याची पद्धत :
१) स्पर्धा ०३ सप्टेंबर २०१५ ते २० सप्टेंबर २०१५ या कालावधीसाठी प्रवेशिका सादर करण्यासाठी खुली राहील.
२) लेखन स्पर्धा खुली असण्याच्या काळात आपले लेखन
येथे प्रकाशित करावे लागेल.
लेखन करण्यासाठी http://www.baliraja.com/node/add/spardha-2015 हा धागा वापरावा.
३) लेखन सादर करण्यासाठी लेखकाला/कवीला
बळीराजा डॉट कॉम चे सभासदत्व घेणे आवश्यक आहे. सभासदत्व विनामूल्य घेता येते.
४) स्पर्धकाची इच्छा असल्यास लेखन टोपण नावाने प्रकाशित करता येईल मात्र टोपण नाव धारक स्पर्धकाचे खरे नाव संपूर्ण परिचयासह
abmsss2015@gmail.com या मेलवर कळवणे बंधनकारक आहे.
५) स्पर्धेच्या कालावधीत आपण प्रकाशित केलेले साहित्य स्पर्धेतील प्रवेशिका म्हणून गणले जावे यासाठी, व्यक्तीगत संपूर्ण माहिती
abmsss2015@gmail.com या ईमेल आयडीवर पाठवणे आवश्यक आहे. (ईमेलच्या विषयात : लेखनस्पर्धा- ललितलेख ब) चरित्रलेख क) वृत्तांतलेख ड) अनुभवकथन/छंदमुक्त कविता/गझल असा उल्लेख असावा.) अन्यथा प्रकाशित साहित्य हे प्रवेशिका म्हणून गृहीत धरले जाणार नाही.
मेलमध्ये स्पर्धकाचे संपूर्ण नाव, संपर्क क्र, विरोप पत्ता (ई-मेल), ब्लॉग पत्ता (असल्यास) व भारतातील पोस्टाचा पत्ता देणे बंधनकारक आहे. अन्यथा स्पर्धक बाद ठरेल, याची नोंद घ्यावी.
६) सदर स्पर्धा सर्वांसाठी खुली आहे.
७) स्पर्धेसाठी आंतरजाल हेच कार्यक्षेत्र असेल त्यामुळे जगभरातील कोणताही मराठी भाषिक या स्पर्धेत भाग घेऊ शकतो.
८) संयोजक मंडळ व परिक्षक मंडळ वगळता अन्य सर्वच (शेतकरी साहित्य चळवळीचे पदाधिकारी सुद्धा) या स्पर्धेत भाग घेऊ शकतात.
९) स्पर्धेसाठी कोणतेही प्रवेश मूल्य नाही, ती सर्वांसाठी खुली आहे.
१०) गद्यलेखनासाठी शब्दमर्यादा - २००० शब्द एवढी असेल.
११) गझलेतील एकूण शेरांच्या १/५ शेर विषयाशी निगडीत असेल तरी ती गझल पात्र समजली जाईल.
गझल मुसलसल असणे अनिवार्य नाही.
नियम व शर्ती :
१) स्पर्धेकरता लिहिलेल्या साहित्यावर मूळ लेखकाचा संपूर्ण अधिकार राहील. मात्र अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळीच्या मुद्रित अथवा आंतरजालीय विशेषांकात सदर लेखन प्रकाशित करायचे झाल्यास तसा हक्क अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळ स्वतःकडे राखून ठेवत आहे.
२) स्पर्धा सुरळित पार पडावी यासाठी स्पर्धानियमांमध्ये वेळोवेळी योग्य ते बदल करण्याचे अधिकार स्पर्धा-व्यवस्थापन आणि अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळ स्वतःकडे राखून ठेवत आहे.
३) स्पर्धकाला वयाचे बंधन असणार नाही.
४) एखाद्या विभागात कमी प्रवेशिका आल्या तर त्यातूनच विजेता निवडला जाईल. उदा. एखाद्या विभागात केवळ ३ प्रवेशिका प्राप्त झाल्या तरी त्यांनाच पारितोषिक घोषित केले जाईल. प्रवेशिका कमी आल्याची किंवा सादर झालेल्या प्रवेशिका दर्जेदार नव्हत्या अशी किंवा या प्रकारची तत्सम सबब सांगितली जाणार नाही.
५) परीक्षक मंडळ १० सदस्यांचे असेल. सर्व परीक्षकांकडून आलेल्या गुणांच्या सरासरीनुसार अग्रक्रमाने विजेते निवडले जातील. स्पर्धेचा निकाल घोषित होईपर्यंत परिक्षकांची नावे गोपनिय ठेवण्यात येतील.
६) सदर स्पर्धेची जाहीरात विविध माध्यमातून प्रसारित करण्यात आली आहे. अनेक हितचिंतकांना सदर माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोचवण्याची विनंती करण्यात आली आहे. या दरम्यान सदर माहिती मध्ये होणार्या सहेतुक/निर्हेतुक बदलांशी स्पर्धा-व्यवस्थापक सहमत असतीलच असे नाही. अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळीच्या
www.baliraja.com या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या स्पर्धा सूचनेच्या धाग्यावरील मसुदा अंतिम मानण्यात येईल.
७) एखादी प्रवेशिका स्वीकारण्याचा वा नाकारण्याचा हक्क अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळ स्वतःकडे राखून ठेवत आहे.
८) अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळीकडे सध्या असलेले मनुष्यबळ लक्षात घेता अपेक्षेहून अधिक प्रवेशिका आल्यास अंतिम तारखेआधीच प्रवेशिका घेणे थांबवण्याचा हक्क अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळ स्वतःकडे राखून ठेवत आहे.
९) निकालाबाबत अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळीने नियुक्त केलेले संयोजक मंडळ व परीक्षक यांचा निर्णय अंतिम राहील. यासंबंधी कोणतेही खुलासे देण्यास वा पत्रव्यवहार करण्यास अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळ बांधील नाही याची कृपया नोंद घ्यावी.
१०) शेतीविषयाला केंद्रस्थानी ठेवून नवसाहित्याची जोमाने निर्मिती होण्यास नवचालना मिळावी, असा उद्देश या स्पर्धा आयोजनामागे असल्याने ही संपूर्ण स्पर्धा अत्यंत सौहार्दपूर्ण वातावरणात पार पाडण्यास सर्वांनी सहकार्य करावे, ही विनंती
आपला स्नेहांकित
गंगाधर मुटे
संस्थापक अध्यक्ष
अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळ
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
प्रतिक्रिया
विश्वस्तरिय लेखन्स्पर्धा २०१५
नमस्कार मुटे सर,
विश्वस्तरीय लेखनस्पर्धा २०१५ अनुमोदन मिळाले. त्याबद्दल धन्यवाद.
माझ्या एक किंव्हा दोन कविता पाठवत आहे.
ह्या उपक्रमास माझ्या खूप खूप शुभेछ्या.
आपला विश्वासू
रविंद्र कामठे
पुणे
आपला विश्वासू,
रविंद्र कामठे
पुणे
भ्र. न. ९८२२४ ०४३३०
इमेल – ravindrakamthe@gmail.com
आपले स्वागत आहे सर!
आपले स्वागत आहे सर!
शेतकरी तितुका एक एक!
आपले स्वागत आहे.
:hurray:
सकस शेतीसाहित्य
कसदार शेतकरी साहित्य लिहायचे असेल तर संपूर्ण शेतीविषय समजून घ्यावा लागेल.
म. फ़ुले, शरद जोशी, शेतकरी आंदोलन, शेतीचे अर्थशास्त्र, शेतीचे अनर्थशास्त्र, शेतकर्यांच्या वेदना, शेतीचे वास्तव, शेतीची दुर्दशा आणि त्यावरील उपाययोजना.
पहिल्या लेखनस्पर्धेत आपण "शेती आणि शेतकरी" हा विषय घेतला होता.
यावेळेस शरद जोशी.
यानंतर वेगवेगळे विषय घेऊ.
त्याशिवाय सकस शेतीसाहित्य निर्माण होऊ शकत नाही, असे मला ठामपणे वाटते.
तुम्हाला काय वाटते?
शेतकरी तितुका एक एक!
नमस्कार सर, कविता सुद्धा शरद
नमस्कार सर,
कविता सुद्धा शरद जोशी साहेबांवरच असावी का ?
होय
लेखन शरद जोशी या व्यक्तिमत्वाला कोणत्या तरी अंगाने स्पर्शून जायला हवे.
शेतकरी तितुका एक एक!
नमस्कार मुटे सर, अतिशय
नमस्कार मुटे सर,
अतिशय स्तुत्य उपक्रम!
या वेळी कवितेबरोबर लेख लिहायचा प्रयत्न करेन.
शुभेच्छा
नमस्कार मुटे सर, अतिशय
नमस्कार मुटे सर,
अतिशय स्तुत्य उपक्रम!
या वेळी कवितेबरोबर लेख लिहायचा प्रयत्न करेन.
शुभेच्छा
लेखनस्पर्धा-२०१५
स्पर्धेसाठी किती कविता पाठवू?
कविता ई-मेल नेच पाठवू का?
टाईप करून पाठवू की फोटो कॉपी Attach करू?
साहित्य " येथे " प्रकाशित करावे असे tab आहे तेथे गेल्यावर "हे पान पहायची परवानगी नाही."
असा मेसेज दिसतो.
कृपया मार्गदर्शन करावे .
आपला
रावसाहेब जाधव
चांदवड (९४२२३२१५९६, ९८८१९१३८४)mail ID : rkjadhav96@gmail.com
रावसाहेब जाधव (चांदवड)
विषय : मा. शरद जोशी
http://www.baliraja.com/node/820 या धाग्यावर सर्व माहिती दिलेली आहेच.
आपण कितीही प्रवेशिका स्पर्धेत सादर करू शकता.
विषय : मा. शरद जोशी
(लेखन शरद जोशी या व्यक्तीमत्वाशी निगडीत व अधोरेखीत करणारे असावे)
शेतकरी तितुका एक एक!
पाने