विश्वस्तरीय लेखनस्पर्धा-२०२२ : वर्ष ९ वे
(अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळीचा उपक्रम)
कोटी कोटी शेतकर्यांचे पंचप्राण
शेतीच्या अर्थवादाचे क्रियाशील जनक युगात्मा शरद जोशी
यांच्या ७ व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त (१२ डिसेंबर २०२२)
सादर करीत आहोत.....
विश्वस्तरीय Online लेखनस्पर्धा-२०२२
लेखनाचा विषय : शेतीविषयक राजकीय धोरण
प्रवेशिका सादर करण्याचा कालावधी : १२ डिसेंबर ते ३१ डिसेंबर २०२२
या स्पर्धेचे चार लेखनप्रकार असतील : गद्यलेखन स्पर्धा-२०२२, पद्यलेखन स्पर्धा-२०२२, अनुभवकथन स्पर्धा-२०२२ आणि समीक्षण-रसग्रहण स्पर्धा-२०२२
-
गद्यलेखन स्पर्धा-२०२२ : विभाग : अ) ललितलेख ब) कथा क) वैचारिक लेख ड) मागोवा इ) शोधनिबंध
-
पद्यलेखन स्पर्धा-२०२२ : विभाग : अ) पद्यकविता ब) छंदमुक्त कविता क) छंदोबद्ध कविता ड) गझल इ) गेय रचना/गीत (पोवाडा इत्यादी)
-
अनुभवकथन स्पर्धा-२०२२ : विभाग : अ) सुखद अनुभव ब) दुःखद अनुभव
-
समीक्षण-रसग्रहण स्पर्धा-२०२२ : विभाग : अ) पुस्तक समीक्षण ब) ललित लेखांचे समीक्षण क) कवितेचे रसग्रहण
(समीक्षणासाठी व रसग्रहणासाठी पुस्तकाची/लेखाची/कवितेची निवड स्पर्धकाने स्वत:च करायची आहे. लेख/कविता "शेतीविषयक राजकीय धोरण" या विषयाशी साधर्म्य राखणारे असणे अनिवार्य आहे.)
प्रत्येक लेखनप्रकारातील विभागानुसार प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाचे पारितोषिक दिले जाईल.
स्पर्धेचे स्वरूप थोडक्यात या प्रमाणे :
-
स्पर्धेत भाग घेण्यासाठी आपले स्वतःचे लेखन प्रवेशिका म्हणून देणे आवश्यक आहे.
-
पूर्वप्रकाशित लेखन देता येईल मात्र लेखन प्रताधिकारमुक्त असावे. प्रताधिकारासंबंधी संपूर्ण जबाबदारी लेखक/कवीची असेल. शक्यतो स्पर्धेसाठी अप्रकाशित व नवीन लेखन/कविता द्याव्यात.
-
एक स्पर्धक सर्व विभाग मिळून जास्तीतजास्त कितीही प्रवेशिका सादर करू शकेल. मात्र एका स्पर्धकाचा एकापेक्षा जास्त पारितोषिकासाठी विचार केला जाणार नाही. महत्तम गूण प्राप्त करणार्या रचनेची पारितोषिकासाठी निवड केली जाईल.
पारितोषिकाचे स्वरूप : प्रत्येक लेखनप्रकारातील विभागानुसार प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाचे पारितोषिक दिले जाईल. पारितोषिकाचे स्वरूप स्मृतीचिन्ह, प्रशस्तिपत्र व पुस्तके या स्वरूपाचे असेल.
निकाल : निकाल अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळीच्या www.baliraja.com या संकेतस्थळावर प्रकाशित केला जाईल.
पारितोषिक वितरण : २१आणि २२ जानेवारी २०२३ ला नियोजित १० व्या अ.भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलनात पारितोषिक वितरण केले जाईल. तेव्हा स्पर्धकाला स्वतः किंवा प्रतिनिधीमार्फत पारितोषिक स्वीकारता येईल. पोस्टाने किंवा कुरिअरने स्मृतीचिन्ह व पुस्तके पाठवली जाणार नाहीत मात्र प्रशस्तिपत्र पोस्टाने पाठवण्यासंबंधी विचार केला जाऊ शकेल.
प्रवेशिका सादर करण्याची पद्धत :
-
स्पर्धा १२ डिसेंबर ते ३१ डिसेंबर २०२२ या कालावधीसाठी प्रवेशिका सादर करण्यासाठी खुली राहील.
-
लेखन स्पर्धा खुली असण्याच्या काळात आपले लेखन प्रकाशित करावे लागेल. ONLINE लेखन करण्यासाठी येथे क्लिक करा.
-
स्पर्धेत सादर झालेल्या प्रवेशिका येथे पाहता येतील.
-
लेखन सादर करण्यासाठी लेखकाला/कवीला बळीराजा डॉट कॉम चे सभासदत्व घेणे आवश्यक आहे. सभासदत्व विनामूल्य घेता येते. मोबाईलवरून लेखन सादर करायचे असल्यास शेतकरी संघटना मोबाईल ऍप (Mobile App) वापरणे सुलभ ठरू शकते. Mobile App डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.
-
स्पर्धकाची इच्छा असल्यास लेखन टोपण नावाने प्रकाशित करता येईल मात्र टोपण नाव धारक स्पर्धकाचे खरे नाव संपूर्ण परिचयासह abmsss2015@gmail.com या मेलवर कळवणे बंधनकारक आहे.
-
स्पर्धेच्या कालावधीत आपण प्रकाशित केलेले साहित्य स्पर्धेतील प्रवेशिका म्हणून गणले जावे यासाठी, व्यक्तीगत संपूर्ण माहिती abmsss2015@gmail.com या ईमेल आयडीवर पाठवणे आवश्यक आहे. (ईमेलच्या विषयात : लेखनस्पर्धा- लेखनप्रकाराचा उल्लेख असावा.) अन्यथा प्रकाशित साहित्य हे प्रवेशिका म्हणून गृहीत धरले जाणार नाही. मेलमध्ये स्पर्धकाचे संपूर्ण नाव, संपर्क क्र, विरोप पत्ता (ई-मेल), ब्लॉग पत्ता (असल्यास) व भारतातील/विदेशातील पोस्टाचा निवासी पत्ता देणे बंधनकारक आहे. अन्यथा स्पर्धक बाद ठरेल, याची नोंद घ्यावी.
-
सदर स्पर्धा सर्वांसाठी खुली आहे.
-
स्पर्धेसाठी आंतरजाल हेच कार्यक्षेत्र असेल त्यामुळे जगभरातील कोणताही मराठी भाषिक या स्पर्धेत भाग घेऊ शकतो.
-
परिक्षक मंडळ वगळता अन्य सर्वच (शेतकरी साहित्य चळवळीचे पदाधिकारी/स्पर्धा व्यवस्थापक सुद्धा) या स्पर्धेत भाग घेऊ शकतात.
-
स्पर्धेसाठी कोणतेही प्रवेश मूल्य नाही, ती सर्वांसाठी खुली आहे.
-
गद्यलेखनासाठी कमाल शब्दमर्यादा - २००० शब्द एवढी असेल.
-
गझलेतील एकूण शेरांच्या १/५ शेर विषयाशी निगडीत असेल तरी ती गझल पात्र समजली जाईल. गझल मुसलसल असणे अनिवार्य नाही.
नियम व शर्ती :
-
स्पर्धेकरता लिहिलेल्या साहित्यावर मूळ लेखकाचा संपूर्ण अधिकार राहील. मात्र अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळीच्या मुद्रित अथवा आंतरजालीय विशेषांकात सदर लेखन प्रकाशित करायचे झाल्यास तसा हक्क अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळ स्वतःकडे राखून ठेवत आहे.
-
स्पर्धा सुरळित पार पडावी यासाठी स्पर्धानियमांमध्ये वेळोवेळी योग्य ते बदल करण्याचे अधिकार स्पर्धा-व्यवस्थापन आणि अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळ स्वतःकडे राखून ठेवत आहे.
-
स्पर्धकाला वयाचे बंधन असणार नाही.
-
एखाद्या विभागात कमी प्रवेशिका आल्या तरी त्यातूनच विजेता निवडला जाईल. उदा. एखाद्या विभागात केवळ ३ प्रवेशिका प्राप्त झाल्या तरी त्यांनाच पारितोषिक घोषित केले जाईल. प्रवेशिका कमी आल्याची किंवा सादर झालेल्या प्रवेशिका दर्जेदार नव्हत्या अशी किंवा या प्रकारची तत्सम सबब सांगितली जाणार नाही.
-
परीक्षक मंडळ १० सदस्यांचे असेल. (परीक्षक मंडळात साहित्यिक, समीक्षक, पत्रकार, शेतकरी, कामगार, राजकीय व्यक्ती, सामाजिक कार्यकर्ता यांचा योग्य त्या प्रमाणात समावेश असेल.) सर्व परीक्षकांकडून आलेल्या गुणांच्या सरासरीनुसार अग्रक्रमाने विजेते निवडले जातील. स्पर्धेचा निकाल घोषित होईपर्यंत परिक्षकांची नावे गोपनिय ठेवण्यात येतील.
-
सदर स्पर्धेची जाहीरात विविध माध्यमातून प्रसारित करण्यात आली आहे. अनेक हितचिंतकांना सदर माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोचवण्याची विनंती करण्यात आली आहे. या दरम्यान सदर माहिती मध्ये होणार्या सहेतुक/निर्हेतुक बदलांशी स्पर्धा-व्यवस्थापक सहमत असतीलच असे नाही. अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळीच्या www.baliraja.com या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या स्पर्धा सूचनेच्या धाग्यावरील मसुदा अंतिम मानण्यात येईल.
-
एखादी प्रवेशिका स्वीकारण्याचा वा नाकारण्याचा हक्क अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळ स्वतःकडे राखून ठेवत आहे.
-
अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळीकडे सध्या असलेले मनुष्यबळ लक्षात घेता अपेक्षेहून अधिक प्रवेशिका आल्यास अंतिम तारखेआधीच प्रवेशिका घेणे थांबवण्याचा हक्क अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळ स्वतःकडे राखून ठेवत आहे.
-
निकालाबाबत अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळीने नियुक्त केलेले संयोजक मंडळ व परीक्षक यांचा निर्णय अंतिम राहील. यासंबंधी कोणतेही खुलासे देण्यास वा पत्रव्यवहार करण्यास अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळ बांधील नाही याची कृपया नोंद घ्यावी.
-
शेतीविषयाला केंद्रस्थानी ठेवून नवसाहित्याची जोमाने निर्मिती होण्यास नवचालना मिळावी, असा उद्देश या स्पर्धा आयोजनामागे असल्याने ही संपूर्ण स्पर्धा अत्यंत सौहार्दपूर्ण वातावरणात पार पाडण्यास सर्वांनी सहकार्य करावे, ही विनंती.
आपले स्नेहांकित
गंगाधर मुटे राजेन्द्र फंड
संस्थापक अध्यक्ष स्पर्धा संयोजक
प्रतिक्रिया
स्पर्धेत सहभाग नोंदविणाऱ्या
स्पर्धेत सहभाग नोंदविणाऱ्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा
अ
पद्यरचना
दिवास्वप्न
स्वप्न माझ्या उरीचे या जन्मी तरी घडेन का ?
भाव बळीराजाच्या मालास..सांगा कुणी मीळेल का?
म्हणती राजकारणी आम्ही आहोत शेतकरीपुत्र
माझे त्यांचे नाते भावकीचे ..आता तरी जडेल का?
निवडणूका होतात जाहीरनामे निघतात
आश्वासनांचे बाजार खोटेखोटेच फुलतात
पंचवार्षिकमध्ये पुढच्या शेतकरी होईल मालमाल
दिवास्वप्न दाखवून पुढारी निवडणूका जिंकतात
सम्रृद्धीच्या आशेने मग बळीराजा सुखावतो
साहेबांना पुन्हा मग तो विधानसभा दाखवतो
राज्यमंत्री साहेब मग कॅबिनेटमध्ये जातात
हा मात्र पाच वर्षे जून्याच किमतीत भागवतो
आजा होता आशेत शेतमालाला भाव येईल
वडील होते अपेक्षेत हे सरकार नक्की देईल
तीसरी पीढीही माझ्या रूपात मनीषा बाळगत होती
भाव मीळून शेतमालाला दारिद्रय माझे पळून जाईल
तीन पिढ्यांच्या आकांक्षा मीळत होत्या धूळीस
सरकारला मात्र पान्हा फूटत नव्हता मुळीच
तरीही करून पुन्हा काबाडकष्ट पेरत राहीलो वावर
अन्नदाता बरे मला म्हणत असतील उगीच ?
निलेश जगदेवराव देवकर
मु.पो.डोंगरगांव,ता.जि.अकोला.444104.
(Via -P.D.K.V. Post Office Akola)
मोबाईल क्रमांक -9604919343
nileshdeokar35@gmail. com
पाने