नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
३.उनाड वारा*
कसा बिल्वरी उनाड वारा डोलारा रे आठवणींचा
मनी चेतवी झुळकी अगणित अभास तुझिया अस्तित्वाचा
शुष्क तनी या वृक्ष डहाळी भेटीसाठी मन बावरते
कुजबुज कानी लहर अशी ही शीळ घालुनी गाणी गाते
छेडी लहरी नवे तराणे स्पर्श रेशमी उठे शहारे
तुझ्या धुंदीने भान हरपले असे सुखाचे मोती सारे
शिरता मिठीत नसे भान मज हिरवाईने हरकुन गेलो
सुखद गारवा चैतन्याचा नवलाईने डुलू लागलो
चहूदिशांनी उडे धुराळा आरास पडे फुलपानाची
सजली अवनी भेट अनोखी साद मनाला रे प्रेमाची
क्षमती सारे शल्य मनीचे अक्षय प्रिती उरात डोले
आलबेल हे बहरो नाते जन्मोजन्मी असे आपुले
- प्रा. राजेंद्र गवळी
कुकाणा ता.नेवासा जि.अहमदनगर