adminशुक्र, 21/10/2016 - 23:17
विश्वस्तरीय लेखन स्पर्धा २०१६ मध्ये सहभाग नोंदवणारांचे मनपूर्वक स्वागत आणि आभार.
स्पर्धेच्या कालावधीत आपण प्रकाशित केलेले साहित्य स्पर्धेतील प्रवेशिका म्हणून गणले जावे यासाठी, व्यक्तीगत संपूर्ण माहिती abmsss2015@gmail.com या ईमेल आयडीवर पाठवणे आवश्यक आहे. (ईमेलच्या विषयात : लेखनस्पर्धा- ललितलेख ब) चरित्रलेख क) वृत्तांतलेख ड) अनुभवकथन/छंदमुक्त कविता/गझल असा उल्लेख असावा.) अन्यथा प्रकाशित साहित्य हे प्रवेशिका म्हणून गृहीत धरले जाणार नाही. मेलमध्ये स्पर्धकाचे संपूर्ण नाव, संपर्क क्र, विरोप पत्ता (ई-मेल), ब्लॉग पत्ता (असल्यास) व भारतातील पोस्टाचा पत्ता देणे बंधनकारक आहे. अन्यथा स्पर्धक बाद ठरेल, याची नोंद घ्यावी.
असा स्पष्ट उल्लेख नियम आणि अटीत असून सुद्धा अनेक सहभागी स्पर्धकांनी abmsss2015@gmail.com या ईमेल आयडीवर इमेल केलेला नाही. ज्यांनी केला आहे त्यांना इमेलद्वारे रिप्लाय देण्यात आलेला आहे.
महत्वाची सुचना :
- ज्यांनी इमेल केलेला नाही त्यांनी तातडीने इमेल करावा. अन्यथा प्रवेशिका बाद ठरवली जाईल, याची नोंद घ्यावी.
- लेखात/कवितेत काही दुरुस्त्या जसे की शुद्धलेखन, व्याकरण वगैरे किंवा विभागात बदल करायचा असल्यास त्यांनी २३/१०/२०१६ पर्यंत धागा संपादन करून बदल करून घ्यावा. त्यानंतर संपादनाची सुविधा बंद करण्यात येईल. नोंद घ्यावी.
धन्यवाद!
Raosaheb Jadhavसोम, 21/09/2015 - 23:54
…….फाळ तापतो………
फाळ तापतो चालतो नांगर
दबल्या निब्बर मातीवरती
जगण्याचा पण सुरा विषारी
चिरून काढतो निधडी छाती ....१
पावसावाचून जळणे कधी
कधी सडवतो पाऊस भोळा
पिकताच कधी पसा-पायली
बाजारभाव हा होतो आंधळा.....२
पायपीट कधी ती कर्जासाठी
वाटलं आभाळ येईल हाती
वर्षानंतर लागते काणगी
टेबलाखालचे राहिले बाकी....३
डोळ्यांपुढे हा दाटला अंधार
तोंडे त्या बिळांची झाकून राही
मुके चांदणे भरल्या ओटीस
आभाळ कधीच गावले नाही ....४
अशा मग चांदण आभाळात
एक उगवला तेजाळ तारा
आंदोलनाचा येठला नांगर
शरद जोशींचा घुमला वारा.......५
बांधल्या पेंढ्या नवविचारांच्या
रचल्या सुड्या मायबायांसाठी
मोट ही बांधली मतामतांची
शेतमालाच्या हमीभावासाठी .....६
उत्पादनाचा जुळवीत खर्च
पिकता विकता उरते काय?
मंथन मात्र आजही चालते
मतपेट्यांच्या या पोटात पाय...... ७
रावसाहेब जाधव (चांदवड)
(९४२२३२१५९६) (rkjadhav96@gmail.com)
७०, महालक्ष्मी नगर,
एस.टी.स्टँड मागे. चांदवड
जि.नाशिक ४२३१०१
Gajanan muleगुरू, 25/08/2011 - 00:42
आपण हे वेब अतिशय उत्तम हाताळता आहात त्याबद्दल हार्दिक अभिनंदन.
श्रीकान्त झाडेबुध, 06/07/2011 - 17:06
Namskaar sir
nuktach tumhala messege paathvila aahe
krupaya paaha
प्रशांत कवळेबुध, 25/05/2011 - 21:15
नमस्कार साहेब!
हा उपक्रम चालु केल्याबद्दल आपले आभारी आहोत, आणी अभिनंदन सुद्धा!
धन्यवाद प्रशांतजी.
या उपक्रमाचे यशापयश मात्र आपणा सर्वांवर अवलंबून आहें.