Ramram नमस्कारRamram
बळीराजावर आपले स्वागत आहे.

लेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून  मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. साईटवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा
बळीराजा डॉट कॉमवर वाचा
कविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......
शेतकऱ्यांची चावडी shetkari dot in

आजच चॅनेल LIKE करा, SUBSCRIBE करा आणि बेलच्या आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन ऍक्टिव्ह करा.
SUBSRIBE करण्यासाठी youtube.com/@chawdi किंवा www.shetkari.in या लिंकवर क्लिक करा.
***

आजचे बाजारभाव

आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.




दोन अनामिक

दोन अनामिक's picture
Email subscriptions: 
Email
Wall Post
दोन अनामिक added a new picture
October 3, 2019 at 12:50am
*गद्यलेखन स्पर्धेसाठी* *भिंगरी*(कथा *) या वर्षी दुष्काळ जरा जास्तीचा असल्यामुळे मामाने आपल्याकडच्या जवळपास साऱ्याच म्हशी विकल्या होत्या,फक्त दोन म्हशी ज्यांच्यात मामाचा जीव जरा जास्तच होता त्यात भिंगरी जिचे शिंगे भिंगरीसारखे गोल गोल होते म्हणून तिला ते नाव पडले आणि लंगडी जी मुळातच पांगळी होती अशा दोन म्हशी त्यांनी विकल्या नव्हत्या.त्याला कारणही तसेच होते भिंगरी म्हणजे अत्यंत हुशार आणि मानवी भाषा सहज समजणारी आणि लंगडी ही मुळातच लंगडी असल्याने तिला खरीददार भेटत नव्हते. मामाकडे यंदाच्या उन्हाळ्यात राजू सुट्टीत आला होता,गोठ्यात फक्त दोनच म्हशी पाहून तो अवाक ! झाला होता," मामा इतक्या साऱ्या म्हशी होत्या,कुठे गेल्या", " आरं गुड्या,(राजूला लाडाने गुड्या म्हणायचे) आपल्यालाच पाणी नाय बघ प्यायला,जनावरांची हाल बघवले जात नाय रं लेका !! म्हणून टाकल्या विकून " मामा म्हणाला. राजू जेमतेम ८ पास झालेला होता,भिंगरीच्या डोळ्यात पाणी त्याला दिसले ,तेवढ्यात तो म्हणाला,"मामा भिंगरी रडतीया रं, काय झाले असल तिला,तिच्या समद्या मैत्रिणी गेल्या म्हणून का रं!!" आता राजूला कळाले होते जनावरांनाही मानवाप्रमाणे भावना असतात,तो लगेचच भिंगरी जवळ गेला आणि तिच्या अंगा खांद्यावरून हात फिरवू लागला,तेवढ्यात भिंगरीही अंगाअंगात शहारली होती,आणि तिचा तो आर्त स्वर "हम्मा" राजूच्या कानात मात्र घर करून बसला होता,का रडत असेल भिंगरी तिची आई तिला सोडून गेली असेल का? की तिची बहीण? की मित्र ?काहीबी कळेनासे झाले होते, रात्री सगळे झोपल्यावर राजू विचार करत जागाच होता, त्याला गोठ्यातन आवाज आल्यानं तो उठला आणि गोठ्याकडे गेला लंगडी झोपली होती पण् भिंगरी जागीच होती, तो पळत घरात आला आणि मामाला उठवू लागला " मामा भिंगरी जागीच आहे,ओरडती आहे,चला ना,ती काबर रडती आहे, बघा ना" राजूने घरातल्या साऱ्यांनाच उठवले होते आणि तो गोठ्यात भिंगरी जवळ गेला होता, तेवढ्यात राजूला लंगडीच्या पायाजवळ काहीतरी दिसले,"अरे देवा, साप " राजू जोऱ्यात ओरडला,तो आवाज ऐकून सारे जागे झाले आणि गोठ्याकडे एकच गर्दी जमली,काही कळायच्या आतच पुन्हा आवाज आला " मामा लंगडी बघ कशी करतिया" "सापाने कात टाकली असेल" गर्दीतून कोणीतरी म्हणाले, एकच आक्रोश भिंगरी का ओरडत होती त्याचा आत्ता कळाला होता,पण् कदाचित आता फार उशीर झाला होता,'लंगडीला दवाखान्यात न्यायला हवे' मामा म्हणाला, गर्दीतून पुन्हा कुणीतरी म्हणाले "अरं एवढ्या रातचाला कोणती गाडी भेटल रं " आणि शेवटी लंगडीने मान टाकलीच," लंगडी गेली रं" मामा ओरडले,राजूच्या मनावर हा फार खोल आघात झाला होता, भिंगरी रात्रभर ओरडतच होती,सकाळी लंगडीला जेव्हा घेऊन जाऊ लागले अंत्यविधीसाठी तेव्हाही भिंगरी ओरडतच होती,ती साखळी तोडण्याचा प्रयत्न करत होती,जवळ कोणालाही येवू देत नव्हती,ती जवळपास वेडावलीच होती,दोन तीन दिवस तिन पेंढ्या पण् खाल्या नव्हत्या,राजू मायेने तिच्या कपाळावरून हात फिरवित म्हणाला दोन घास खाऊन घे ना ! तिचे डोळे पानावलेले होते,जनावरे पण् किती जीव लावतात ना एकामेकांना,तेवढ्यात मामा म्हणाले "भिंगरीला विकावे लागेल असे वाटतया,एकठी कावरीबावरी झालीया ती" ," नाही", राजू ओरडला " ,मी भिंगरीला नाय विकू देणार," तो ओरडून सांगतच होता आजी समजूत काढत होती " अरे लेका,तुला एकठ्याला तुझ्या मित्राविना कसे वाटेल," तशी ती एकठी पडलीया तिला तिकडे मित्र मैत्रिणी भेटतील मग तिचे मन लागेल," आजीची गोष्ट राजूला समजली होती पण् भिंगरी विना कसे होइल,तो फार अस्वस्थ झाला होतां,दिवस उजाडला तसे गाडीत टाकून भिंगरीला बाजरात घेऊन जाण्याची तयारी झाली होती,गोठा आता लावारिस दिसू लागला होता,एक ...एक म्हैस त्या गोठ्याला सोडून चालली होती,राजू पहिले गाडीत जाऊन बसला होता,आणि गोठ्याकडेच पाहात पाहात त्याचेही डोळे भरून आले होते,भिंगरी पण् गोठ्याकडे पाहून ओरडत होती ,भिंगरीला दोरीने बांधण्यात आले, गाडी सूरू झाली तेवढ्यात आजी म्हणाली " खाटीकाला नग विकुसा," आणि ढसाढसा रडत सुटली ,आजी रडती पण् का हे राजूला कळले नाही,तो म्हणाला काय झाले मामा आजी काहून रडतीया" ,' खाटीक म्हणजे काय रं' मग मामाने सांगितले तेव्हा मात्र राजुच्या पायाखालची जमीन सरकली,"मामा तुला माझी आन् हाय नग् विकूसा रं भिंगरीला ",पण् मामा ऐकण्याच्या बेतात नव्हता,मला पण् लय वाटत रं पण् भिंगरीचे हाल बघवले जात नाही रं गुड्या, म्हणून म्या मजबूर हाय. गिऱ्हाइक समोर आले भाव ठरला आणि .... आणि भिंगरी विकली,भिंगरी ओरडतच होती,ते स्वर राजूला अस्वस्थ करत होते,शेवटी मामा म्हणाला लय लाडाची हाय व इका खाटीकाला नग विकुसा,श्रावणात म्या जास्त पैसे घेऊन परत येईल तोवर सांभाळा फक्त,मामाचे डोळे भरले होते,राजू तर पूर्ण पणे अश्रूमध्ये भिजला होता,भिंगरी जात होती राजू तिच्या माग जात होता,हात उंच करून भिंगरीला आवाज देत होता,भिंगरे भिंगरे .... पण् दलाल तो दलालच,त्याला फक्त पैसा जोडून पैसा कमावयचा असतो ,मामा गाडीत पैसे मोजत होता,आणि तेवढ्यात परत एक मोठा आवाज आला " मामा" तो आवाज राजूचा होता," त्या दलालांनी भिंगरीला खाटीकाला विकले वाटतया ,म्या पाहिले " तसे मामा आणि राजू बाजारात धावले,पण् ना भिंगरी दिसली ना खाटीक ना दलाल,कुठ गेली भिंगरी... म्या सांगितले होते मामा विकू नग सा आता मला भिंगरी पाहिजे म्हणजे पाहिजे,तेवढ्यात मामा ही जोऱ्यात ओरडला " भिंगरी........" "भिंगरी.... ,मला माफ कर भिंगरी" आणि आणि... काय चमत्कार खाटीकाला सोडून भिंगरी पळत येतांना दिसू लागली, कदाचित मामाची ती हाक तिच्यापर्यंत पोहचली होती, तिच्या माग चार पाच लोक काठ्या घेऊन धावत होते,तिला मारत होते, तेवढ्यात राजू जोऱ्यात ओरडला" मामा भिंगरी आली वाचवा", ती बघा, तेवढ्यात मामा गाडीवरचा हात काढून माग फिरला, भिंगरी धावत येत होती तेवढ्यात मामा म्हणाला " थांबा तिला मारू नका" ती माझी भिंगरी आहे ,राजू पळत जाऊन तिच्या गळ्यात पडला होता, भिंगरी ओरडतच होती , तिच्या आर्त स्वरात , आणि राजू रडत होता. पण् भिंगरीला परत पाहून त्याला आता मात्र आनंद झाला होता. *©®डॉ.राज रणधीर* *९९२२६१४४७१* *जालना*
गंगाधर मुटे स्पर्धेत लेखन करण्यासाठी http://www.baliraja.com/node/add/spardha-2019 या लिंकवर क्लिक करून लेखन करून प्रकाशित करावे. अन्यथा स्पर्धेसाठी प्रवेशिका म्हणून स्वीकारले जाणार नाही.
October 3, 2019 at 06:33pm
दोन अनामिक added a new picture
October 3, 2019 at 12:49am
*पद्य लेखन स्पर्धेसाठी* *गझल* *कातळ मागे सोडुन...* कातळ मागे सोडुन त्यांना पाझर होणे जमले नाही डोळ्यामधल्या या अश्रूंना बेघर होणे जमले नाही.... पडीकजमिनीगत जीवन हे कुणाच्याच ना कामी आले कोरडवाहू आयुष्याचा नांगर होणे जमले नाही., कणखरतेने घाव झेलले.,पण शेवट मन तुटून गेले कशी परिक्षा या जन्मीही.,पत्थर होणे जमले नाही., त्या नेत्यांनी हळहळ केली दुष्काळाची पोळी केली कुणा उपाशी या दुनियेचा इश्वर होणे जमले नाही.., कोळपनीला सुखदु:खाच्या कुठे वाफसा मिळतो हल्ली दुनियादारी कळली नाही साक्षर होणे जमले नाही... ओठ सखीचे लालबुंद पण,तिचे बोलणे कडवट होते गिळून सारे ते कडवट पण.,साखर होणे जमले नाही... चुकार दाणे जरी फेकले देवावरती तन्मयतेने त्या दाण्यांना गरिबाची पण भाकर होणे जमले नाही.. *©®डॉ.राज रणधीर* *९९२२६१४४७१* *जालना*
गंगाधर मुटे स्पर्धेत लेखन करण्यासाठी http://www.baliraja.com/node/add/spardha-2019 या लिंकवर क्लिक करून लेखन करून प्रकाशित करावे. अन्यथा स्पर्धेसाठी प्रवेशिका म्हणून स्वीकारले जाणार नाही.
October 3, 2019 at 06:33pm

परिचय

सदस्याचे पूर्ण नाव
डॉ.राज दत्तात्रेय रणधीर
जन्मतारीख
20/08/1983
लिंग
पुरूष
शिक्षण
बी एच एम एस एम डी
व्यवसाय
वैद्यकीय
E-mail (विरोप)
madhurarandhir2@gmail.con
शहर
जालना
राज्य
महाराष्ट्र
देश
भारत
आवडते कलाकार/लेखक/कवी

फ मु शिंदे
कुसुमाग्रज
पु ल देशपांडे
सुरेश भट्ट

कालावधी

खरडवही
खरडवहीतील नोंदी पाहा
सदस्य कालावधी
5 वर्षे 3 months