पिढ्यान्पिढ्यांच्या अबोलतेला लिहिते-बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
काव्यधारा
शेतकरी काव्य
औंदाचा पाऊस
सायबीन झालं पोटलोड, पराटी केविलवाणी कोमात गेलं शिवार सारं, व्वा रे पाऊसपाणी ......!!
उन्हाळवाही-जांभूळवाही, शेती केली सुधारीत बी-बेनं खत-दवाई, बीटी आणली उधारीत नवं ज्ञान, नवं तंत्र, उदीम केला पुरा पावसाच्या उघाडीनं, स्वप्न झालं चुरा खंगून गेली कपाशी, बोंड बोरावाणी ......!!
बेनारचा बाबू म्हणे कापूस नाही बरा औंदा पेर सायबीन, बरकत येईन घरा नाही उतारा तिलेबी, खासर उलार होते रोग झाला गेरवा,एकरी दीड पोते बिनपाणी हजामत, चीत चारखानी ......!!
सायबाचं दप्तर म्हणते, पीक सोळा आणे अक्कल नाही तूले म्हून, भरले नाही दाणे
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali ***
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
सध्या बळीराजावर 1 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहे.