पिढ्यान्पिढ्यांच्या अबोलतेला लिहिते-बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न
गझल : उद्योग हिरवळीचा
देशात जर कृषीचा या होत घात आहे. सरकारचा सरळ मग याच्यात हात आहे.
दररोज घोषणांच्या देतात भुलथापा, असल्या छळात मी हा येथे रहात आहे.
वर्षानुवर्ष करुनी ऊद्योग हिरवळीचा, आल्हाद-पण न येणे ही काय बात आहे?
मी न्याय मागुनी पण ऐकत कुणीच नाही, अन्याय मजवरी हा का होत जात आहे?
जिंकायलाच सारे असतात खेळ खेळत, पण हारणे नशीबी हेही जगात आहे !
झाले निदान तर मग उपचार कर म्हणावे, आजार काय हा हो मज जन्मजात आहे?
खाणार काय सांगा शेती करून माती? विळख्यात जर ऋणाच्या आयुष्य जात आहे!
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali ***
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
सध्या बळीराजावर 2 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.