नमस्कार ! बळीराजावर आपले स्वागत आहे.

पराटीच्या बोंडामंदी...!

Ravi Dharne's picture
लेखनप्रकार: 
पद्यलेखनस्पर्धा-२०१४
लेखनविभाग: 
पद्यकविता

पराटीच्या बोंडामंदी...!

पराटीच्या बोंडामंदी
कसं कापुस हासते,
जसं पुनवंच्या राती
चांद आभायी दिसते !

तुह्या वाफ्यात मिरची
माह्या वाफ्यात भेदर,
असा उंगवला धान
जसा पिप्याले शेदर.!

कसं खलखल वाहे
पाणी नाटात खेलत,
पारीवरच्या तुरी गा
हासे डुलत डुलत.!

दिसे शिवार हिरवा
जसा नेसलाय शालू,
डोयी घेवुन शिदोरी
हाक देई माही मालू.!

देवा अशिच रावु दे
आमा लेकरावं माया,
घास भरवं सुकाचा
रोज पडीन मी पाया.!

- रवी धारणे
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*

Share

Comments

  • गंगाधर मुटे's picture
    गंगाधर मुटे
    Tue, 11/11/2014 - 14:18. वाजता प्रकाशित केले.

    सुरेख कविता धारणेजी.

    शेतकरी तितुका एक एक!


  • Mohan Kurhade's picture
    Mohan Kurhade
    Tue, 11/11/2014 - 18:21. वाजता प्रकाशित केले.

    khup mst


  • हेमंत साळुंके's picture
    हेमंत साळुंके
    Tue, 11/11/2014 - 18:51. वाजता प्रकाशित केले.

    वाचून या ओळी आठवल्या... कुणाच्या हे मात्र माहित नाही.
    ह्या नागव्या पर्हाटीला
    कंदी लागायाची बोंड
    कस कराव लगीन
    मह्या जीवाची तू धोंड..

    हेमंत साळुंके


  • Pages

Layout Settings