नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
आत्महत्येच्या प्रयत्नात अंतिम श्वासात असलेला
शेतकरी सरकारी इस्पितळात पडलाय,
मायबाप, बायको-पोरं ईश्वराला पाण्यात बुडवत
त्याचा जीव वाचवण्यासाठी साकडं घालताय...
आत्महत्या हा गुन्हा आहे हे सारं समजावून
सांगन्यासाठी
इन्स्पेक्टर, पत्रकार व वकिल साहेब कलम घेऊन
याची शिक्षा तुरूंगवासच...
सावकार कसा मागे राहिल? कारण पांढ-या सोन्यासाठी
( प-हाटी ) मी जमीन, बायकोचं
मंगळसूत्र व पोरीच्या
लग्नासाठी जमविलेले दागिने गहाण ठेवलेत व
त्यावरील
व्याजाची रक्कम किती हे सांगतोय...
नामदार साहेब चक्क आश्वासन देत जे झालं ते जाऊ दे!
आम्ही नक्की ह्या बाबीचा
विचार करू व मागे त्यांचे
निवडणुकीत उभे असताना भाषण ऐकले होते
की,
यंदा पांढ-या सोन्याला 'पिवळ्या' सोन्याइतका भाव देऊ...
मग एन्ट्री झाली ती गावच्या
प्रतिष्ठित गुरूजींची.
अरे नाम्या, यंदा पीक तर चांगलं झालं होतं ना!
कुठल्या वाईट संगतीस लागला रे बाबा?
बाई, मटका, का? जुगार...
शेवटी आलेत व्यापारी युनियनचे अध्यक्ष
सांत्वन करायला...
सा-यांच्या मुखात एकच प्रश्न-
तू असे करायला पाहिजे नव्हते!!
माझे डोळे मिटण्याआधी सर्वांच्या डोळ्यात बघताना दिसलं
की,
कसं माझं पांढरं सोनं करपलय.
सावकाराने आकारलेल्या दुप्पट व्याजात?
नामदार साहेबांनी दिलेल्या भाववाढीच्या खोट्या
आश्वासनात?
व्यापा-याने मातीमोल किंमतीत
घेतलेल्या मालात?
या सर्वांच्या नावे तक्रार करूनही न ऐकणा-या व लाच घेणा-
या
इन्स्पेक्टरच्या खिशात?
पैसा घेऊनही फितुररूपी चाल खेळनार्या
वकिलाच्या षडयंत्रात...?
लेखणीचे हत्यार वापरून न्याय मिळवून देणारे पत्रकार
ज्यांची लेखणी न्याय
शोधण्या ऐनवेळी गोठली.
की सारासार माहीत
असूनही गुरूजींची
उलटी पट्टी मलाच का?
..मग अखेरच्या घटकेत मुलाच्या डोळ्यात बघत
मी आत्महत्या केली नाही तर
माझा खून झाला आहे माझ्याच हातून!
बाळा तू स्वतःला सावर मी वारसा म्हणून
"आभाळभर कर्जाचं डोंगर" देत आहे.
अंतिम इच्छा म्हणून पुन्हा तुला करपलेल्या पिकाचं
पांढरं सोनं बनवायचं आहे... बा...ळा!
- प्रवीण बा. हटकर
मु.पो.ता. बार्शिटाकळी,
जि.अकोला
प्रतिक्रिया
स्वागत प्रविण हटकर
कवितेच्या माध्यमातून शेतीविषयाच्या सखोल चिंतनाकडे वाचकाला खेचून नेण्याची ऐपत असल्याची चुणूक दाखविणारी कविता.
दाहक वास्तव
शेतकरी तितुका एक एक!
पाने