Ramram नमस्कारRamram
बळीराजावर आपले स्वागत आहे.

लेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून  मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. साईटवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा
बळीराजा डॉट कॉमवर वाचा
कविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......

आजचे बाजारभाव

आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.




निदान शेतकरी साहित्यिकांत तरी मतभेद असू नयेत! : मा. आ.यड्रावकर : 12sss

निदान शेतकरी साहित्यिकांत तरी मतभेद असू नयेत!
स्वागताध्यक्ष : मा. आ. श्री. राजेंद्र पाटील यड्रावकर, विधानसभा सदस्य  यांच्या भाषणातील ठळक मुद्दे 
 
  • शेतकऱ्याच्या जीवनामध्ये सुद्धा अनेक पैलू आहेत हे सगळे पैलू उघडण्याचं काम आपण या साहित्य संमेलनाच्या माध्यमातून करताय त्याबद्दल मनापासून मी आपल्याला धन्यवाद देतो, आपलं अभिनंदन करतो आणि विशेषतः पश्चिम महाराष्ट्रातला एक लोकप्रतिनिधी म्हणून मी सगळे साहित्यिक शेतकरी आले आहेत, त्यांचं सुद्धा मनापासून स्वागत करतो. 
  • सन्माननीय शरद जोशी साहेबांनी शेतकरी चळवळ महाराष्ट्रामध्ये उभी केली, शेतकऱ्यांच्या हक्कासाठी म्हणून अनेक चळवळी उभ्या केल्या, मग कापसाचा प्रश्न असेल, कांद्याचा प्रश्न असेल, ऊसाच्या प्रश्नावर सुद्धा अनेक वेळा आंदोलन झालीत. निश्चितपणे ज्या ज्या वेळेला आंदोलन झाली आणि त्यानंतर एफआरपी आली. ज्या शहरांमध्ये आज हे शेतकरी साहित्य संमेलन होतोय ते मला सांगायला आनंद वाटतो की रिकव्हरी बेसवर सर्वाधिक दर देणारा जर कुठला भाग असेल तर हा शिरोळ आणि हातकणंगले तालुक्यात आहे. जे काही सहकारी साखर कारखाने, खाजगी कारखानदार आहेत हे सर्वाधिक भाव देणारे, रिकव्हरीच्या पर्सेंटेजने अधिक भाव देणारे आणि एक रक्कमी भाव देणारे सुद्धा आहेत.
  • शेतकरी म्हणून आपण एक तर मागणी करतो कर्जमाफीची आणि दुसरी ऊसाच्या दराची. शासनाने जरी दर ठरवून दिले तरी सुद्धा मार्केटच्या आधारावर शेतीचे भाव अवलंबून राहतात. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये केवळ नुसतं भाव द्या म्हणून चालणार नाही, शासनाला काहीतरी ठोस अशा पद्धतीच्या सूचना करायला पाहिजेत.
  • शेतकऱ्यांसाठी सहाय्यभूत व्हावी यासाठी म्हणून जी यंत्रणा शासनाने केलेली आहे, त्या यंत्रणेमध्ये सुद्धा कुठेतरी सुधारणा होण्याची गरज आहे आणि आपण सुद्धा कागदावर मांडून शासनाने नोंद घ्यावी अशा पद्धतीचं मंथन आपल्या या सगळ्या साहित्य संमेलनात व्हायला पाहिजे. मंथन करून त्याला कायमस्वरूपी सोल्युशन काय हे आता सरकारला देणे किंवा आपण सुद्धा विचारमंथन करणे हे सुद्धा तेवढच गरजेचं आहे. आपण बघितलं की अनेक वेळा कर्जमाफी झाली तरी सुद्धा आज आमच्या शेतकऱ्यांच्या डोक्यावरून कर्ज उतरलेलं नाही. मग यात आमचं काय चुकतंय याच्यावर सुद्धा मंथन झालं पाहिजे. कर्जमाफी झाली तरीसुद्धा आम्हाला शेती परवडत नाही, मग याची कारणं काय याचा  शोध घेणं आणि त्या दृष्टीने उपाययोजना करणं महत्त्वाचं आहे. येणाऱ्या काळामध्ये संमेलनाच्या माध्यमातून व्हावं अशा पद्धतीची अपेक्षा या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी करतो.
  • अलीकडच्या काळामध्ये पर्जन्यमानाचं बिघडचं सगळं प्रमाण जर बघितलं तर येणाऱ्या काळामध्ये शेतीबद्दल धोरण आणि आधुनिकता आपण जर स्वीकारली नाही तर भविष्यकाळामध्ये शेती करणं आपल्याला कधीही परवडणार नाही.
  • आज १०  एकर, १५ एकर सगळ्या बागायती जमिनी असून सुद्धा आजच्या तरुण पिढीला मुलगी सुद्धा देत नाही, ही खऱ्या अर्थाने ही शोकांतिका आहे कारण जर फक्त पाच एकर जमीन आमच्याकडची धरली तर तिची किंमत साधारण दोन कोटी रुपये जमिनीची किंमत होते पण जो माणूस 25,000 पगारावर पुण्याला नोकरी करतो त्याला मात्र लगेच मुलगी मिळते आणि आज सुद्धा अडीच अडीच कोटी रुपयांची शाश्वत जमीन असून सुद्धा आज पोरी मिळत नाही, हे सुद्धा आमचं एक दुर्दैव!
  • आम्ही स्वतःला शेतकरी म्हणतो पण आमच्या पुढच्या पिढीला शेतीमध्ये घालावं की नाही असा प्रश्न आमच्या समोर तयार होतो. मग आमची मानसिकताअशी होते की काहीही करून पोरांना शिकवायचं. एकदा पुण्याला नाही तर मुंबईला नोकरीला पाठवायचं! बीएससी ऍग्री झालेल्या प्रत्येक पोरांना विचारलं कि तू काय होणार? तर तो सांगतो की मी तलाठी नाहीतर ग्रामसेवकाच्या परीक्षेला बसणार. एमपीएससी-यूपीएससी परीक्षा देणार. कुणालाच शेती करावीशी वाटत नाही.
  • मी काल परवा कुठेतरी वाचलं की परत आणखी दोन चार दिवसांनी जयसिंगपूरात शेतकरी साहित्य संमेलन होणार आहे. हे असं होता कामा नये. मी राजकारण म्हणून बोलत नाही पण चळवळ एकसंघ असली तर तिची ताकद राहते. शेतकरी चळवळीमध्ये वितुष्ट असणे शेतकऱ्यांच्या दृष्टीने फारसं चांगलं नाही. चळवळीपुरतं ठीक आहे पण आज साहित्यामध्ये सुद्धा आपल्यामध्ये मतभेद होत असतील तर भविष्यकाळाच्या दृष्टीने हे चित्र चांगले नाही.
  • आज शेतकरी अडचणीत आहे. आज शेतकऱ्यांना सुद्धा वाटतंय की मी शेती ठेवावी का नको? अशा पद्धतीच्या विचारात ज्यावेळेला शेतकरी येतोय त्यावेळेला त्या शेतकऱ्याला आधार देणं, त्याला प्रोत्साहन देणं ही सामाजिक कार्यकर्ता म्हणून, शेतकरी साहित्याचा वारकरी म्हणून आपल्या सगळ्यांची जबाबदारी असते आणि एकमेकांत मतभेद असू नयेत अशी अपेक्षा एक शेतकरी म्हणून मी या ठिकाणी करतो, आपल्याला सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो, आपल्या साहित्य संमेलनाला मनापासून शुभेच्छा देतो आणि थांबतो!
Share