नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळीचा उपक्रम
विश्वस्तरीय Online लेखनस्पर्धा-२०२४
लेखनाचा विषय : *शेतमालाचे भाव*
शीर्षक : *शेतमालाला भावच नाही*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
कशी करायची शेती आम्ही, सुचेना आम्हास काही
घाम गाळून पिकवलेल्या, शेतमालाला भावच नाही.. ध्रु.
दुबार पेरणी झाली कधी, कधी अवकाळीही आला
एकही देव पावला नाही, तेव्हा कुठलाच नवसाला
गेलो त्रासून शेती करता, जीव झाला त्राही त्राही
घाम गाळून पिकवलेल्या, शेतमालाला भावच नाही...१
किती सोसायच्या अजून आम्ही, अशाच मरणकळा
शेतकऱ्यांच्या आयुष्याला, लागे संकटांच्याच झळा
बळीराजा म्हणून करता, गड्यांनो उगाच वाह वाही
घाम गाळून पिकवलेल्या, शेतमालाला भावच नाही...२
साठविण्या धड वखार नाही, भिजून सडते ज्वारी
काळोखाने माखलेल्या, या दिसतात दिशा चारी
आस भरल्या नजरेनं सारे, भिरभिर पाहत राही
घाम गाळून पिकवलेल्या, शेतमालाला भावच नाही...०३
कसं शिकवाव मुला मुलींना, पडतो रोजच प्रश्न
रोज रोज कुठून आणायचं, सांगा अवसान उसणं
पल्याड गेलं दुखणं आमचं, कळेना कुणालाही
घाम गाळून पिकवलेल्या, शेतमालाला भावच नाही...०४
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*लीलाधर रामेश्वरजी दवंडे*
मुक्काम पोस्ट - आजनी ( रडके )
तालुका -कामठी, जिल्हा- नागपूर
मुख्य पोस्ट - कन्हान पिंपरी
441401
संपर्क - 8412877220