नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
*विश्वस्तरीय काव्य लेखन स्पर्धा - २०२४*
*विषय :- शेतमालाचे भाव*
*काव्य प्रकार :- गीत*
*शेतकऱ्याला नाही वाली*
( शिशा तुटे तो जुड़ जाये...)
पदरी अमुच्या घोर निराशा
शेतकऱ्याला नाही वाली...
नेहमी डोळ्यांमधला पाऊस
जमीन करतो माझी ओली...
चोची मधले दाणे पेरून
ठेऊन माझे पिल्ले उपाशी...//धृ//
पिकास माझ्या भावही नाही
ओरड करते काळी आई...
बळीराजाची झोप उडाली
शासनाला जागच नाही...
सातरणीला तेल न माझ्या
दलाल खातो रोज तुपाशी...//१//
नियतीचा हा खेळं ,,सारा
डोळ्यांमध्ये नेहमी धारा...
कधी पेरणी, कापणी नंतर
पिक तुडविते गारपीट वारा
एकदाच तू मरणं देगा
का लावतो,, रोजचं फासी...?//२//
ऐकत नाही कुणी बळीचे
दुखणे सांगू कोणा पाशी...
✍️ गीत
सुनिल बावणे - निल
बल्लारपूर, चंद्रपूर
८३०८३३४१२३
प्रतिक्रिया
खूप छान!
खूप छान!
मुक्तविहारी
वाह.. चोचीमधले दाणे पेरून...
वाह.. चोचीमधले दाणे पेरून... खूप सुंदर
पाने