नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
पाऊस
जेव्हा पाऊस बरसत असतो
सगळ्या सृष्टीला हसवीत असतो
वृक्षांवरी पसरते लकाकी नवी
चहूकडे पसरते मखमल हिरवी
खळाळतात सगळे नाले-ओढे
आनंदाने डोलतात हिरवी झाडे
बळीराजांची पिकांची प्रतीक्षा संपवी
भारतभूमीस सुजलाम-सुफलाम बनवी
पण जेव्हा पाऊस रुसून बसतो
कितीही विनविल्या बरसत नसतो
पावसाविना पिके जातात करपून
घरातील अन्नधान्य जाते संपून
विहिरी-तळी आटून जातात
गाई-गुरे तडपून मरतात
सर्व चराचर भुकेने व्याकूळ होते
चहूकडे रुक्ष वाळवंट विक्राळ हसते
करण्यास सर्व जीवसृष्टीचे कल्याण
फुंकण्यास सर्व चराचरात प्राण
पावसाने सदा बरसत राहावे
संपूर्ण जगाचे पालनपोषण करावे
आहे ईश्वरचरणी हीच प्रार्थना
पूर्ण होवो चराचराची मनोकामना
प्रतिक्रिया
सुंदर कविता. सारा खेळच
सुंदर कविता.
सारा खेळच पावसाचा आहे.
जास्त आला तरी नुकसान आणि कमी आला तरी नुकसान.
पद्धतशीर बरसणे पावसाला आवडत नसावे.
शेतकरी तितुका एक एक!
धन्यवाद!!!
धन्यवाद!!!
पाने