![]() ![]() बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
लेखनविभाग- गीतरचना
प्रवेशिका-विश्वस्तरिय लेखनस्पर्धा-२०२०
करोना तुझ्यामुळे रे.....
जिवन उदास झाले करोना तुझ्यामुळे रे
सारे भकास झाले करोना तुझ्यामुळे रे
फुलपाखंरे घराच्या बागेत सुन्न झाली
कीलबिल पहाटवेळी घरट्याकडे पळाली
सारे जीवास भ्याले करोना तुझ्यामुळे रे...
शेतात रोपट्यांना आणू कुठून पाणी
डोळ्यांत आसवांची आटली कहाणी
जिडीपी मंद झाली करोना तुझ्यामुळे रे...
हुंड्याची काळजी ना तरीही गरीबी दैना
सनई ना चौघडा अन् दारात पंगती ना
शादी गरीब झाली करोना तुझ्यामुळे रे...
तोंडास मास्क लावा हातास स्वच्छ ठेवा
जेष्ठांची काळजी घ्या अंतर सदैव ठेवा
"एकांत" हीतकारी करोना तुझ्यामुळे रे...
डाउन-लाँक झाले करोना तुझ्यामुळे रे...
"एकांत"
नरेंद्र भा. गंधारे
हिंगणघाट ,जि-वर्धा
९२८४१५१७५६
प्रतिक्रिया
छान गीतरचना नरेंद्रभाऊ
छान गीतरचना नरेंद्रभाऊ
धन्यवाद.
आभार आपले.राजेश
Narendra Gandhare
मस्त
छान
Dr. Ravipal Bharshankar
आभार.
धन्यवाद, डाँक्टरसाहेब...
Narendra Gandhare
प्रवेशिकेचे स्वागत
शेतकरी तितुका एक एक!
पाने