![]() ![]() बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
महा गड्या ! महागड्या, बेगड्या विकासाचं झकास रूपडं मांडलंस
तगड्या, रांगड्या निसर्गाला भकास नागडं सांगाडं करून सोडलंस
महा रड्या ! रडारडी करून समाज माध्यमातनं आभासी जगाशी नातं जोडलंस
पण रडीचा डाव खेळून 'माज' माध्यमातनं वास्तव जगाशी नातं तोडलंस
जमीन, समुद्र, आकाश, ताऱ्यांना झोडलंस
झाडं, झुडपं, पिकं, वाऱ्यांना तोडलंस
राने, वने, शेती, खोऱ्यांना मोडलंस
पर्वत, डोंगर, टेकड्या, दऱ्यांना फोडलंस
नद्या, नाले, ओढे, झऱ्यांना गाडलंस
जैवविविधता अन् संसाधनं या बऱ्यांना झाडलंस
परिसंस्था अन् पर्यावरण या खऱ्यांना फाडलंस
आमंत्रण मात्र प्रदूषण करणाऱ्या साऱ्यांना धाडलंस
प्राणी अन् पक्ष्यांच्या शरीरात सुखानं नांदणाऱ्या करोनाला छेडलंस
रानटीपणानं नको तेच प्राणी अन् पक्षी खाऊन कोविडनं स्वत:लाच पिडलंस
सर्व धर्मांच्या धार्मिक स्थळांना मरणाला घाबरून बंद पाडलंस
दांभिकपणे देव देव करून देवातल्या देवत्वाला खोटं पाडलंस
ढोंगी श्रद्धेच्या पुराव्याचं प्रदर्शन जगासमोर निर्लज्जपणे मांडलंस
नैतिक मुल्यांना अनैतिकतेच्या ढिगाऱ्याखाली निर्दयपणे गाडलंस
माणुसकीला 'आयसोलेशन' अन् 'क्वॉरंटाइन' करून कोंडलंस
'लॉकडाउन' करून किती भ्रष्टाचारी करोना विषाणूंना पकडलंस ?
'डिजिटल' अन् 'ऑनलाइन' वाटमारीनं शिक्षणक्रांतीला उघडं पाडलंस
'मेडिकल' अन् 'सलाइन' लुटमारीनं आरोग्यक्रांतीला नागडं पाडलंस
बळे बळे बळी जायला बळवंत बळीराजाला बळजबरीनं भाग पाडलंस
कृषिप्रधान देशाच्या कृषीवंत कृषीवलाला कृशवंत कृशवल करून गाडलंस
छद्म देशभक्तीला 'ब्रँडिंग' अन् 'मार्केटिंग' करून बाजारात मांडलंस
सच्च्या देशभक्तीला, देशभक्तांना अन् देशाला देशोधडीला धाडलंस
भारत, हिंदुस्थान अन् 'इंडिया' अशी अदृश्य फाळणी करून राष्ट्राला तोडलंस
जातिधर्माचे 'कंटेनमेंट झोन' करून भेदभावाच्या करोनानं समाजाला फोडलंस
समाजकारणाचा खोटा आव आणून राजकारणात स्वत:ला जखडलंस
विघातक धर्मकारणापायी विधायक अर्थकारणाला मुळासकट उखडलंस
निसर्ग - सौंदर्य, निसर्ग - सामर्थ्य, निसर्ग - समृद्धीला ओरखडलंस
निसर्ग - संपदा, निसर्ग - संस्कार, निसर्ग - संस्कृतीला ओरबडलंस
आता तर निसर्गानं तुला तुझी औकात दाखवून तुझी घमेंड तोडलीय !
अमानुषपणा सोडून माणसासारखं वागायला लावून तुझी खोड मोडलीय !
महा गड्या ! गंडवागंडवी करून निसर्गाला गंडवता गंडवता तूच गंडलायस !
महा रड्या ! रडवारडवी करून निसर्गाला रडवता रडवता तूच रडलायस !
प्रतिक्रिया
प्रवेशिकेचे स्वागत
शेतकरी तितुका एक एक!
धन्यवाद !
धन्यवाद !
आपला विनम्र विनीत ,
महान चव्हाण
MAHAAN CHAVAN
स्मायलीजचा छान वापर
स्मायलीजचा छान वापर केला आहे.
शेतकरी तितुका एक एक!
पुनश्च धन्यवाद HTML चे !
पुनश्च धन्यवाद HTMLचे
मुटे सर, आपण माझ्या 'धन्यवाद!' या प्रतिसादाचे कौतुक केलेत, याबद्दल पुनश्च धन्यवाद! पण सर, ही किमया दोन प्रकारच्या HTML मुळे घडली. त्यातील पहिले जगप्रसिद्ध HTML म्हणजे Hyper Text Markup Language आणि दुसरे HTML म्हणजे H - HTML ; T - तंत्राविषयी ; M - मुटेंचा ; L - लेख. ( संदर्भ : - बळीराजावर वापरण्यायोग्य HTML कोडिंग : लेखक - गंगाधर मुटे : दिनांक २०-१०-१९ )
आपली ' माहिती तंत्रज्ञान ( IT ) कार्यशाळा लेखमाला ' ही बळीराजाला तंत्रस्नेही
( टेक्नोसॅव्ही - Technosavvy ) होण्याकरिता अनमोल मार्गदर्शन करणारा दीपस्तंभ आहे. याचा प्रत्यक्ष पुरावा म्हणून माझा स्वानुभव प्रात्यक्षिकासहित माझ्या ' धन्यवाद ! ' या प्रतिसादाच्या स्वरूपात मी आपणा सर्वांसमोर सादर केलेला आहेच !
आपला विनम्र विनीत,
महान चव्हाण.
MAHAAN CHAVAN
आणि दुसरे HTML
आणि दुसरे HTML म्हणजे H - HTML ; T - तंत्राविषयी ; M - मुटेंचा ; L - लेख.

हाच पूर्ण प्रतिसाद ''बळीराजावर वापरण्यायोग्य HTML कोडिंग ; दिनांक २०-१०-१९'' या धाग्यावर टाकावा.
शेतकरी तितुका एक एक!
' अनमोल मार्गदर्शन करणारा दीपस्तंभ ! '
' अनमोल मार्गदर्शन करणारा दीपस्तंभ ! '
बळीराजाला तंत्रस्नेही
( टेक्नोसॅव्ही - Technosavvy ) होण्याकरिता ' अनमोल मार्गदर्शन करणारा दीपस्तंभ ' अशी ख्याती झालेली आपली ' माहिती तंत्रज्ञान ( IT ) कार्यशाळा लेखमाला ' ही सध्या आपण का खंडित केली आहे ? आम्ही आपल्या नवनवीन लेखांची खूप आतुरतेने आणि मोठ्या उत्सुकतेने वाट पहात असतो.
आपला रसिक वाचक,
महान चव्हाण
MAHAAN CHAVAN
पाने