![]() ![]() बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
घरच्या घरीच राहुन खळगी भरू कशी मी.
बंदीत सांग माझी शेती करू कशी मी.
म्हणतात पाळलेल्या प्राण्यांस दूर ठेवा,
हातात बैल जोडी आता धरू कशी मी.
पोटात जीव तान्हा आला अशा अवेळी.
वाटूनही तयावर शतदा मरू कशी मी.
सौंदर्य फुलवणारे उचलून हात माझे,
माझीच मेश जाळी ही कातरू कशी मी.
आयुष्य आज गेले कित्येक वर्ष मागे,
ही वाट 'प्रदिप' खंडित पुढची सरू कशी मी.
प्रदिप थूल, हिंगणघाट, जि. वर्धा.
9850484233
प्रतिक्रिया
व्वा! क्या बात है!
बहुत बढिया प्रदिप भाऊ..

"आयुष्य आज गेले कित्येक वर्ष मागे,
ही वाट 'प्रदिप' खंडित पुढची सरू कशी मी."
अतिशय मार्मिक! अतिशय सुंदर गझल!!
Dr. Ravipal Bharshankar
खुप छान गझल प्रदिप सर
खुप छान गझल प्रदिप सर
अतिशय मवाळ रचना
पोटात जीव तान्हा,....
कि लाँकडाउन चा बहाणा..
व्वा.. मस्त...गांधीजी...
Narendra Gandhare
प्रवेशिकेचे स्वागत
शेतकरी तितुका एक एक!
धन्यवाद
धन्यवाद मुटे सर आपले मनःपूर्वक अभिनंदन
पाने