
  नमस्कार !  ![]() बळीराजावर आपले स्वागत आहे.  | 
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
कोरोना: रडे भूमीचा हा दास
घरामध्ये थांबा तुम्ही,
नका बाहेराला फिरू,
नका गावात हुंदडू ,
बांधा मनाचं वासरू.
हाथ दहादा धुवावे  ,
इथे पाण्याची ही बोंब,
 आम्ही पाण्याविना मरु ,
 अरे कोरोन्या तू थांब.
नाही हाताला या काम  ,
नाही पोटाला भाकर,
रडे भूमीचा हा दास ,
देतो खोटेच ढेकर.
गळा फाडुनिया सांगू  ,
ऐकेलं काय हे शासन,
रक्त घामापेक्षा स्वस्त ,
मिळो सर्वाना राशन.
कश्या बडवाव्या थाळ्या ,
कसे पेटवावे दिवे,
जीव घेण्या गरिबाचा ,
आले विषाणू हे नवे.
किरण शिवहर डोंगरदिवे
समता नगर, मेहकर ता मेहकर
जि बुलढाणा पिन 443301
मोबा 7588565576
      
    
      
प्रतिक्रिया
प्रवेशिकेचे स्वागत
शेतकरी तितुका एक एक!
पाने