नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
अशीही उत्तरे-भाग-२
…. थोडक्यात उत्तरे लिहा ….
प्रश्न – आपले नांव सांगा ?
उत्तर – श्यामला तात्याविंचू चावला.
प्रश्न – पृथ्वीचे खंड किती व कोणते ?
उत्तर – सात. एखंड,श्रीखंड,भुखंड,दोरखंड,रेवाखंड,झारखंड आणि उत्तराखंड.
प्रश्न – महासागराची नावे लिहा ?
उत्तर – नवसागर,गंगासागर,आनंदसागर,प्रेमसागर आणि विद्यासागर.
प्रश्न – काकाच्या पत्नीला काकी,मामाच्या पत्नीला मामी तर मेव्हण्याच्या पत्नीला ?
उत्तर – मेव्हणी
प्रश्न – कवि हरिवंशराय बच्चन यांची सर्वश्रेष्ठ रचना ?
उत्तर – अमिताभ बच्चन.
प्रश्न – उंदीर दुधात पडल्यास काय करावे ?
उत्तर – उंदीर दुधाबाहेर काढून स्वच्छ पाण्याने साबुन लावून धुवून टाकावा नंतरच दुधाची बासुंदी करावी.
…………………..
प्रश्न – अनुप्रास अलंकाराचे उदाहरण सांगा ?
उत्तर – अर्थाअर्थी अर्थ नसलेल्या अर्थशुन्य अर्थकारनाचा अर्थपूर्ण अर्थसंकल्पाशी अर्थाअर्थी अर्थ जोडून अर्थाचे अनर्थ करण्यात काय अर्थ आहे अर्थमंत्री साहेब?
…………………
….. अपूर्ण गाणी/म्हणी पूर्ण करा. ….
प्रश्न – देखा है पहली बार ……………
उत्तर – उद्धव के घरमे पवार… कसके पकड़, कसके पकड़.
प्रश्न – पाण्यातला मासा झोप घेतो कैसा …………
उत्तर – खावे त्याचा रस्सा तेंव्हा कळे .
…………………………
१) प्रकाशवर्षाची व्याख्या करा .
उत्तर – अनवाणी पायाने प्रकाश एका वर्षात जेव्हड़े अंतर पायी-पायी चालत जातो त्या अंतरास प्रकाश वर्ष म्हणतात.
२) तुमच्या आवडीची जाहिरात लिहून दाखवा.
उत्तर -
…….. काय झालं ?
…….. बाळ रडत होतं.
…….. एक कानशिलात दे त्याच्या.
…….. तू लहान असताना मी पण तुला तेच देत होते.
गंगाधर मुटे
———————————————————————————————–
नोंद :- या रचना माझ्या स्वरचित आहेत परन्तु या घडामोडी दैनंदिन जिवनचर्येशी संबधित असल्याने या तर्हेची विनोदनिर्मिती यापूर्वीही झाली असू शकते.
———————————————————————————————–
प्रतिक्रिया
झकास!
हाहाहा!
मेव्हणी विशेष आवडली.
पाने