नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
एकीच्या गीताचा जोपासू छंदं !
घरासाठी धुऱ्यासाठी झगडा करू बंदं
एकीच्या गीताचा जोपासू छंदं ||ध्रृ.||
आपले कष्ठ आपले पीक
कावून मांगतो आपण भीक
मातीत जन्मून मातीसाठी
मरणं आपणावर शीक
आता नाही मरायचं असं करायचा बंडं
एकीच्या गीताचा जोपासू छंदं ||१||
आपली शेती आपली माती
भाव ठरवतो दुसरा
आपल्या मातीत कारखाणे
न् आपूनच हात पसरा
बंदं झालं पाह्यजेन भौ सवार आता दंडं
एकीच्या गीताचा जोपासू छंदं ||२||
जगणं-मरणं घटकाचं
टळलं का दादा कोणाचं
कण्हत-कुथत जगण्यापरस
न्यायासाठी लढायचं
शिवाजीचे वारस आपण नाही हाहोत षंडं
एकीच्या गीताचा जोपासू छंदं.||३||
- आशिष वरघणे
रा. सिरूड पो. वेळा त. हिंगणघाट जि. वर्धा
पिन. ४४२३०१
मो. ९६३७८१३५०६
प्रतिक्रिया
Dhirajkumar B Taksande
छान गीतरचना!
मस्त
सुंदर
Dr. Ravipal Bharshankar
पाने